नवी दिल्ली - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जम्मू काश्मीरमधील स्थितीमध्ये करण्यात येणाऱ्या सुरक्षेच्या उपाययोजनांची माहिती दिली. गेल्या काही दिवसांपासून जम्मू काश्मीरमध्ये परप्रांतीय नागरिकांवरील दहशतवादी हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केंद्रीय तपास संस्था, राज्यांचे पोलीस महासंचालक आणि गृहमंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची सोमवारी बैठक घेतली. त्यानंतर गृहमंत्र्यांनी दुसऱ्याच दिवशी जम्मू आणि काश्मीरमधील सुरक्षेविषयी पंतप्रधानांना माहिती दिली.
हेही वाचा-शिवसेनेची वाटचाल काँग्रेस, राष्ट्रवादीच्या विचारांच्या दिशेने - देवेंद्र फडणवीस
गेल्या 18 दिवसांमध्ये दहशतवादी संघटनांकडून 11 नागरिकांची हत्या करण्यात आली आहे. केंद्रशासित प्रदेशांमध्ये करण्यात येणाऱ्या सुरक्षेच्या उपाय योजनांची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पंतप्रधानांना दिली. सध्याच्या हिंसाचारावर कडक कारवाई करण्याची शाह यांनी सुरक्षा संस्थांना सूचना दिली आहे.