महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Amarnath Yatra 2023 : अमरनाथ भाविकांच्या पहिली तुकडी बालटालकडे रवाना; नायब राज्यपालांनी दाखवला हिरवा झेंडा - भगवती नगर बेस कॅम्प

अमरनाथ यात्रा 2023 ला जाणाऱ्या भाविकांच्या पहिली तुकडी अमरनाथ यात्रेसाठी रवाना झाली आहे. जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी आज हिरवा झेंडा दाखवल्यानंतर अमरानाथ यात्रा सुरू झाली. जम्मू येथील बेस कॅम्पवर साडेतीन हजार भाविक दाखल झाले असून हे भाविक बालटालकडे रवाना झाले आहेत.

Etv Bharat
Etv Bharat

By

Published : Jun 30, 2023, 9:26 AM IST

अमरनाथ भाविकांच्या पहिली तुकडी बालटालकडे रवाना

जम्मू :अमरनाथ भाविकांच्या पहिल्या तुकडीला जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा हे आज भगवती नगर बेस कॅम्प येथून हिरवा झेंडा दाखवणार आहेत. भाविकांची पहिली तुकडी अमरानाथ यात्रेसाठी आज रवाना होण्यासाठी सज्ज झाली आहे. हिमालयातील भगवान शिवाच्या 3 हजार 880 मीटर उंच गुहेतील शिवलिंगाचे हे भाविक दर्शन घेणार आहेत. अमरनाथ यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठी तगडी व्यवस्था करण्यात आल्याची माहिती गुरुवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

अमरनाथ यात्रा चालणार 62 दिवस :अमरनाथ यात्रा ही अत्यंत कठिण असल्याचे मानले जाते. या यात्रेत दोन मार्ग असून आज सकाळी जम्मू काश्मीरचे राज्यपाल मनोज सिन्हा यातील पहिल्या तुकडीला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. ही यात्रा 62 दिवस चालणार आहे. अमरनाथ यात्रेला काश्मीरमधून 1 जुलै रोजी अनंतनाग जिल्ह्यातील पारंपारिक 48 किमीचा नुनवान-पहलगाम मार्ग आहे. तर गंदरबल जिल्ह्यातील बालटाल मार्ग हा 14 किमीचा लहान मार्ग असून या दुहेरी मार्गावरून अमरनाथ यात्रेला सुरुवात होईल.

साडेतीन हजार भाविक दाखल :अमरनाथ यात्रेत देशभरातील भाविक मोठ्या उत्साहाने सहभागी होतात. अमरनाथ यात्रा 2023 साठी देशभरातील साडेतीन हजार भाविक जम्मू काश्मीरमध्ये दाखल झाले आहेत. जम्मूच्या भगवती नगर बेस कॅम्पमध्ये या भाविकांना आज राज्यपाल मनोज सिन्हा हे हिरवा झेंडा दाखवणार आहेत. राज्यपालांनी हिरवा झेंडा दाखवल्यानंतर अमरनाथ यात्रेला सुरुवात होणार आहे.

अमरनाथ यात्रेसाठी तगडी सुरक्षा व्यवस्था :अमरनाथ यात्रेला शनिवारी बालटाल आणि पहलगामच्या बेस कॅम्पमधून औपचारिक सुरुवात होईल. भगवती नगर बेस कॅम्पमध्ये आणि आजूबाजूला तगडी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. भाविकांना घेऊन जाणारा काफिला जम्मूहून काश्मीरसाठी निघणार आहे. या भाविकांच्या सुरक्षेसाठी लष्कर, पोलिसांच्या जवांनासह सीआरपीएफच्या तुकड्या चोख बंदोबस्त करत आहेत.

राज्यपालांनी बेस कॅम्पला भेट देऊन घेतला आढावा :भाविकांच्या सुरक्षेचा आणि व्यवस्थेचा राज्यपाल मनोज सिन्हा यांनी आढावा घेतला. गुरुवारी रात्री भाविकांच्या बेस कॅम्पला राज्यपाल मनोज सिन्हा यांनी भेट देऊन हा आढावा त्यांनी घेतल्याची माहिती सुरक्षा दलाच्या प्रवक्त्याने दिली आहे. राज्यपाल मनोज सिन्हा यांनी भाविकांच्या भोजन, निवास, सुरक्षा व्यवस्था, संयुक्त नियंत्रण कक्ष, लंगर स्टॉल, नोंदणी काउंटर, वीज आणि पाणीपुरवठा, आरोग्य सुविधा आणि स्वच्छता यांचा आढावा घेतला. दळणवळणाच्या सुविधा, आरोग्य कर्मचारी, अग्निशमन दल आणि आपत्कालीन सेवा यांचाही त्यांनी आढावा घेतला. बेस कॅम्पवर आलेल्या देशभरातून भाविकांचे मनोज सिन्हा यांनी स्वागत केले.

भाविक आणि साधूंसाठी ऑन द स्पॉट नोंदणी :यात्रेसाठी येथे येणाऱ्या अनोंदणीकृत भाविक आणि साधू यांची ऑन द स्पॉट नोंदणी करण्याची प्रक्रिया गुरुवारी शहर प्रशासनाने सुरू केली. शहरातील शालिमार भागात नोंदणी नसलेल्या भाविकांना ऑन द स्पॉट नोंदणी केंद्र सुरू करण्यात आले आहे. तर पुराणी मंडईस्थित राम मंदिर परिसरात साधूंच्या नोंदणीसाठी विशेष शिबिर सुरू करण्यात आले आहे. देशाच्या सर्व भागातून येथे येणाऱ्या अनोंदणीकृत भाविक आणि साधूंची नोंदणी येथील काउंटरवर सुरू झाली आहे, असे उपविभागीय दंडाधिकारी (SDM) नरगेश सिंह यांनी वृत्तसंस्थेला सांगितले. संपूर्ण जम्मूमध्ये 33 निवास केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. तर नोंदणी केंद्रांवर रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन (RFID) टॅग जारी केले जातील अशी माहिती उपायुक्त अवनी लवासा यांनी दिली आहे.

3 लाख भाविकांनी केली ऑनलाईन नोंदणी :अमरनाथ यात्रेसाठी भाविकांची सर्व व्यवस्था सुरू आहे. भाविकांच्या स्वागतासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याचे आयुक्तांनी सांगितले. यात्रेकरूंच्या तत्काळ नोंदणीसाठी पाच काउंटर वैष्णवी धाम, महाजन सभा, पंचायत घर येथे आणि दोन गीता भवन आणि राम मंदिर येथे साधूंच्या नोंदणीसाठी स्थापन करण्यात आले आहेत. यात्रेकरूंना नोंदणी केंद्रावरच आरएफआयडी टॅग प्रदान केला जाणार आहे. यात्रेसाठी आतापर्यंत 3 लाखांहून अधिक भाविकांनी ऑनलाइन नोंदणी केल्याची माहितीही यावेळी त्यांनी दिली आहे.

हेही वाचा -

  1. Amarnath Yatra : खराब हवामानामुळे अमरनाथ यात्रा तात्पुरती थांबवली
  2. Amarnath Yatra 2023 : अमरनाथ यात्रेला होणार 1 जुलैपासून सुरुवात, जाणून घ्या कसा असेल यात्रेचा प्रवास आणि सुरक्षा

ABOUT THE AUTHOR

...view details