हैदराबाद - 'सॉरी' हा सर्वात लहान शब्द आहे, ज्याला बोलण्यासाठी सर्वात जास्त शक्ती लागते असे म्हटले जाते. मग तुम्ही बॉलीवूड स्टार असाल आणि करोडो रुपये पणाला लावले तर ते आणखी कठीण होऊन बसते. मात्र, खिलाडींचा खिलाडी अक्षय कुमारने 'सॉरी' म्हणत चाहत्यांची माफी मागितली आहे. ( Akshay Kumar On Vimal advertisement ) नुकताच अभिनेता अक्षय कुमारने 'विमल'ची एक जाहिरात केली. कंपनीच्या विमल इलायची ब्रँडसाठी अजय देवगण आणि शाहरुख खानसह अक्षय कुमार असलेली जाहिरात प्रसारित झाली. त्यानंतर तो चांगलाच ट्रोल झाला. त्यानंतर त्याने सर्वांची माफी मागितली आहे.
अशा गोष्टींना प्रोत्साहन देणार नाही - या जाहिरातीनंतर निरोगी जीवनशैलीने लोकांना प्रेरित करणारा अक्षय कुमार चाहत्यांच्या आणि समीक्षकांच्या निशाण्यावर आला. सोशल मीडियावर मीम्स बनवले जाऊ लागले. चाहत्यांनी नाराजी आणि चिंता व्यक्त करण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे, अक्षयने अनेकदा जाहीरपणे सांगितले आहे की, तो सिगारेट पीत नाही किंवा त्याने कधी दारूला हातही लावला नाही. तो कोणत्याही प्रकारची मादक द्रव्ये घेत नाही आणि अशा गोष्टींना प्रोत्साहन देणार नाही, असे अनेकवेळा सांगताना दिसला आहे.
चाहत्यांची माफीही मागितली आहे - हे सगळे जाही सांगत असताना मग गुटखा-पान मसाला बनवणाऱ्या 'विमल' या कंपनीची कसकाय करतो असे म्हणत चाहत्यांनी त्याला ट्रोल केले. आता अक्षय कुमारने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करून चाहत्यांना सांगितले आहे की, त्याने गुटखा-पान मसाला बनवणाऱ्या 'विमल' या कंपनीसोबतचा करार संपुष्टात आणला आहे. यासोबतच त्याने चाहत्यांची माफीही मागितली आहे.