लखनौ- समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी मोठा निर्णय जाहीर केला आहे. पुढील वर्षात होणाऱ्या उत्तर प्रदेशची विधानसभा निवडणू लढविणार नसल्याचे समाजवादी पक्षाचे अध्यक्ष यादव यांनी जाहीर केले आहे. आझमगढमधील सपाचे खासदार असलेले अखिलेश यादव हे पक्षाच्या मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून ओळखले जातात.
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव म्हणाले, की राष्ट्रीय लोक दल आणि समाजवादी पक्षातील युतीबाबत अंतिम स्वरुप देण्यात आले आहे. केवळ जागा वाटपाला अंतिम स्वरुप देण्यात येणार आहे. निवडणुकीत शिवपाल यादव यांच्या प्रगतीशील समाजवादी पार्टी लोहियाची मदत घेण्याबाबत विचारले असता त्यांनी समस्या नसल्याचे सांगितले. मात्र, योग्य सन्मान दिला जावा, अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशचे वाटोळे केले आहे. निवडणूक जाहीरनाम्यातील 90 टक्के दावे पूर्ण केल्याचे भाजपचे दावे खोटे आहेत.
हेही वाचा-पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पोप फ्रान्सिस यांना भारत भेटीचे दिले निमंत्रण
भाजप व आरएसएसचे दावे खोटे