हैदराबाद : एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी कोल्हापुरातील हिंसाचारासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जबाबदार धरले आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नुकत्याच कोल्हापुरात झालेल्या 'औरंगजेब की औलाद' या वक्तव्यावर आक्षेप घेतला. त्याच्यामुळे वाद पेटला, असे त्यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस इतके तज्ञ आहेत, हे मला माहित नव्हते. मग गोडसे आणि आपटे यांचीही मुले कोण आहेत, हे कळायला हवे? असा सवाल ओवेसी यांनी केला.
कोणत्या नियमांतर्गत नावे देण्यास मनाई : महाराष्ट्रातील कोल्हापुरात बुधवारी दोन गटांमध्ये हिंसक हाणामारी झाल्यानंतर संचारबंदी लागू करण्यात आली. जमावाला पांगवण्यासाठी आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. कोल्हापुरातील हिंसक चकमकीवर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, महाराष्ट्र सरकारने कोणत्या नियमांतर्गत लोकांची नावे देण्यास मनाई आहे हे सांगावे. औरंगजेब, बाबर, खिलजी, बहादूर शाह जफर, शाहजहाँ, जहांगीर, कुली कुतुबशाह या नावांवरही बंदी घालण्यात आली आहे, हे कोणत्या नियमाखाली आहे, ते सरकारने जाहीर करावे, असे ते म्हणाले. या नावांचा कोणीही उल्लेख करू शकत नाही.