हैदराबाद : एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी तेलंगाणामधील आदिलाबाद येथे केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. चीनने दोन हजार किलोमीटर भूभागावर कब्जा केला आहे. हिम्मत असेल तर चीनवर सर्जिकल स्ट्राईक करुन तो भूभाग परत आणा असे आव्हान त्यांनी गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केले.
भारत-चीन सीमेवरुन केंद्र सरकारवर हल्लाबोल :एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांच्या भाषणाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये असदुद्दीन ओवैसी यांनी अतिशय प्रक्षोभक भाषण केल्याचे दिसून येते. असदुद्दीन ओवैसी यांनी पाकिस्तानचे नाव न घेता सहानुभूती दाखवली आहे. त्याचबरोबर भारत-चीन सीमा वादाबाबत त्यांनी केंद्रातील भाजप सरकारला आव्हान दिले. चीनने दोन हजार किलोमीटर भूभागावर कब्जा केला आहे. हिम्मत असेल चीनवर सर्जिकल स्ट्राईक करुन तो भूभाग परत आणा असे आव्हान त्यांनी यावेळी गृहमंत्री आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केले आहे.
दोन समाजात तेढ पसरवल्याचा आरोप :एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी अमित शाह यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. अमित शाह यांनी दोन समुदायांमध्ये भेदभाव केल्याचा आरोप असदुद्दीन ओवैसी यांनी केला. 'मंदिरांसाठी कोट्यवधी रुपये मंजूर केले आणि अमित शाह म्हणतात की सुकाणू माझ्या हातात आहे. सुकाणू माझ्या हातात आहे, मग भाजपवाल्यांना त्रास का? जुन्या शहरात सर्जिकल स्ट्राईक करणार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. मात्र हिम्मत असेल तर चीनवर सर्जिकल स्ट्राईक करा, असे आव्हानही असदुद्दीन ओवैसी यांनी यावेळी दिले.
नवीन संसदेचे उद्घाटन पंतप्रधान मोदींनी करू नये :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन संसद भवनाचे उद्घाटन केल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. या वादात असदुद्दीन ओवैसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. संसदेच्या नव्या इमारतीच्या उद्घाटनावरून असदुद्दीन ओवैसी यांनी सरकारवर ताशेरे ओढले. नवीन संसद भवनाच्या इमारतीचे उद्घाटन पंतप्रधान मोदींनी करू नये, असे असदुद्दीन ओवैसी यांनी स्पष्ट केले होते. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी नवीन संसद भवनाचे उद्घाटन केले नाही तर आम्ही कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसल्याची भूमिका असदुद्दीन ओवैसी यांनी घेतली होती.
हेही वाचा -
- Owaisi Criticized PM: नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत, चित्रपटाचे प्रमोटर नाहीत- ओवैसींची 'द केरला स्टोरी' चित्रपटावरून टीका
- Asaduddin Owaisi : संसदेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन 'यांनी' करावे, पहा काय म्हणाले ओवैसी
- Narendra Modi To Visit Pushkar : पंतप्रधान नरेंद्र मोदी राजस्थान दौऱ्यावर; ब्रह्मदेवाच्या पूजेनंतर करणार महाजनसंपर्क अभियानाला सुरुवात