महाराष्ट्र

maharashtra

By

Published : May 15, 2021, 5:59 PM IST

ETV Bharat / bharat

कोरोनाला घाबरू नका, परंतु जागरूक रहा; एआयजीची मार्गदर्शिका वाचा!

कोरोनाची दुसरी लाट वेगवेगळया भागात वेगवेगळ्या वेळेत आली असून तिला रोखण्यासाठी प्रशासनाकडून आटोकाट प्रयत्न केले जात आहेत. या लाटेत दररोज कोरोनाची लागण होणाऱ्याची संख्या लाखांवर तर मृतांचा संख्या हजारांवर पोहचली आहे.

कोरोना
कोरोना

हैदराबाद - देशात कोरोनाची दुसरी लाट पसरली आहे. कोरोना विस्फोटामुळे भारतात दुसरी लाट आल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. कोरोनाची दुसरी लाट वेगवेगळया भागात वेगवेगळ्या वेळेत आली असून तिला रोखण्यासाठी प्रशासनाकडून आटोकाट प्रयत्न केले जात आहेत. या लाटेत दररोज कोरोनाची लागण होणाऱ्याची संख्या लाखांवर तर मृतांचा संख्या हजारांवर पोहचली आहे.

लसीकरणाविषयी वाचा..

कोरोनाचा प्रसार ज्या वेगाने झाला आहे. त्याच प्रमाणात कोरोनाची लक्षणे, निदान आणि उपचारसंदर्भातील चूकीची माहिती सोशल माध्यमांवर पसरली आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यामुळे अगदी सौम्य लक्षणे असलेले लोक रुग्णालयात गर्दी करत आहेत, तर काही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय सीटी स्कॅन करून घेत आहेत. ही सर्व परिस्थिती लक्षात घेता हैदराबादस्थित गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी आशियाई संस्थेने (उदरांत्रविकारांचा अभ्यास करणारी आशियाई संस्था) कोरोनासंदर्भात लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी मार्गदर्शिका तयार केली आहे. ही मार्गदर्शिका एआयजीचे अध्यक्ष व एमडी डॉ. डी. नागेश्वर रेड्डी आणि एआयजीचे संचालक डॉ. जी व्ही राव यांनी तयार केली आहे.

असा आहार घ्या...
कोरोनाची अगदी सौम्य लक्षणे असल्यास काय करावे...

कोरोनासंदर्भातील चुकीची माहिती अनावश्यक भीती आणि शंका निर्माण करते. भीती व चिंता यामुळे रोग प्रतिकारशक्ती खराब होते. तर आतापर्यंत गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी आशियाई संस्थेमध्ये तब्बल 20 हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. हे लक्षात घेता, एआयजीने लोकांना कोरोनावरील उपचार आणि प्रोटोकॉल समजण्यास मदत करेल, असे मार्गदर्शक तयार केले आहे. एआयजी लवकरच सर्व भारतीय भाषांमध्ये त्याचे भाषांतर करणार आहे.

कोरोनाची लक्षणे, दुर्लक्ष करू नका...
घरी आयसोलेशनमध्ये असलेल्यांसाठी...
कोरोनाचे निदान असे करा...
मूलभूत औषधोपचार...
रुग्णालयात भरती केव्हा व्हावे...

भविष्यात अशा साथीच्या आजारांवर सामोरे जाण्यासाठी विशेष नियोजन करण्याची आवश्यकता आहे. खरं तर, सार्वजनिक आणि खासगी रुग्णालये एका छताखाली आणणे महत्त्वाचे आहे. वेगवेगळ्या ठिकाणी दिल्या जाणार्‍या वैद्यकीय सेवांबद्दल जनतेला स्पष्ट कल्पना असेल. असे प्रयत्न काही प्रमाणात दिल्ली आणि बेंगलुरुमध्ये केले गेले आहेत.

लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी ही मार्गदर्शिका

ABOUT THE AUTHOR

...view details