महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Goa Assembly Election 2022 : उमेदवारीसाठी कोणत्या राजकीय पक्षाचा तरुणाईकडे कल? वाचा, विशेष आढावा - agewise candidate goa

येत्या 14 फेब्रुवारीला सोमवारी गोवा विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. सध्या या राज्यात भाजपचे सरकार आहे. यावेळी या निवडणुकीसाठी सर्वच पक्षातील कोणत्या वयोगटातील उमेदवार रिंगणात उतरले आहेत. याचा ईटीव्ही भारतने आढावा घेतला.

Goa Assembly Election 2022
गोवा विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदान

By

Published : Feb 12, 2022, 8:19 PM IST

Updated : Feb 14, 2022, 6:05 AM IST

हैदराबाद - येत्या 14 फेब्रुवारीला सोमवारी गोवा विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. सध्या या राज्यात भाजपचे सरकार आहे. यावेळी या निवडणुकीसाठी सर्वच पक्षातील कोणत्या वयोगटातील उमेदवार रिंगणात उतरले आहेत. याचा ईटीव्ही भारतने आढावा घेतला. वाचा, सविस्तर... (संदर्भ - भारतीय निवडणूक आयोग)

40 विधानसभा मतदार संघासाठी मतदान होणार आहे. राज्यात एकूण 1722 मतदान केंद्रे आहेत. राज्यात एकूण मतदारांची संख्या 11 लाख 56 हजार 762 इतकी आहे. यापैकी 5,62,790 पुरुष तर 5,93,968 महिला मतदार आहेत.

यावेळी 301 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यात उत्तर गोव्यातील 156 तर दक्षिण गोव्यातील 145 उमेदवारांचा समावेश आहे. 301 उमेदवारांमध्ये 275 पुरुष तर 26 महिला उमेदवार आहेत. यातील उमेदवारांच्या वयाची आकडेवारी पाहिली तर सर्वात जास्त वयाचे उमेदवार हे रवी नायक आहेत. त्यांचे वय 75 इतके आहे. ते पोंडा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. तर तेच दुसरीकडे सर्वात कमी वयाचे उमेदवार पाहिले तर सुजय गौन्स (सांकेलिम) आणि मोहम्मद रेहान मुजेवार (नावेलिम) हे आहेत. या दोघांचे वय 26 इतके आहे.

पक्षानुसार 25-40 वयोगटातील उमेदवार -

  • महाराष्ट्रवादी गोमंतक (MAG) - 4
  • क्रांतिकारी गोवा (RGP) - 24
  • शिवसेना (SS) - 3
  • काँग्रेस (INC) - 4
  • राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) - 4
  • गोएंचो स्वाभिमान (GSP) - 2
  • भाजप (BJP) - 1
  • अपक्ष (IND) - 12
  • संभाजी ब्रिगेड (SB) - 1
  • आम आदमी पक्ष (AAP) - 7
  • ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस (AITC) - 3

पक्षानुसार 60 वर्षांवरील उमेदवार -

  • अपक्ष (IND) - 5
  • भाजप (BJP) - 9
  • काँग्रेस (INC) - 4
  • जय महा भारत पक्ष (JMBP) - 1
  • गोएंचो स्वाभिमान (GSP) - 1
  • आम आदमी पक्ष (AAP) - 5
  • महाराष्ट्रवादी गोमंतक (MAG) - 2
  • राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) - 3
  • संभाजी ब्रिगेड (SB) - 1
  • क्रांतिकारी गोवा (RGP) - 1
  • ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस (AITC) - 2

वयानुसार महिला उमदेवार -

  • 25 ते 35 वयोगट - 4
  • 36 ते 45 वयोगट - 14
  • 46 ते 55 वयोगट - 5
  • 56 ते 65 वयोगट - 1
  • 65 वयाच्या वर - 2

हेही वाचा -Goa Assembly Election : गोव्यात किती महिला विधानसभेच्या रिंगणात, याबद्दलचा विशेष रिपोतार्ज...

पक्षानुसार महिला उमेदवार -

  • अपक्ष (IND) - 6
  • भाजप (BJP) - 3
  • आप (AAP) - 3
  • क्रांतिकारी गोवा (RGP) - 2
  • काँग्रेस (INC) - 2
  • ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस (AITC) - 4
  • महाराष्ट्रवादी गोमंतक (MAG) - 1
  • शिवसेना (SS) - 2
  • गोएंचो स्वाभिमान (GSP) - 1
  • संभाजी ब्रिगेड (SB) - 2

मोठ्या पक्षांमधील उमेदवारांचे वयानुसार विश्लेषण -

पक्ष 25-35 36-45 46-55 56-65 65 वर्षांवर एकूण
भाजप 1 3 20 13 3 40
काँग्रेस 1 10 17 7 2 37
आप 2 14 17 4 2 39
अपक्ष 5 16 31 14 2 68

महाराष्ट्रवादी

गोमंत

1 53 3 4 0 13
तृणमूल काँग्रेस 2 9 10 4 1 26
इतर 20 27 17 13 1 78
एकूण 32 84 115 59 11 301
Last Updated : Feb 14, 2022, 6:05 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details