महाराष्ट्र

maharashtra

गलवान चकमकीतून चीनने घेतला धडा; अधिक तयारीची आवश्यकता भासली - बिपिन रावत

By

Published : Jun 23, 2021, 10:23 AM IST

भारतासोबत गलवानमध्ये झालेल्या संघर्षानंतर अधिक चांगले प्रशिक्षण आणि तयारी आवश्यक असल्याची अनुभूती चिनी सैन्याला झाल्याचे संरक्षण प्रमुख (चीफ ऑफ डिफेन्स) बिपिन रावत यांनी सांगितले. चिनी सैनिक प्रामुख्याने अल्प कालावधीसाठी भरती केले जातात. त्यांना हिमालयासारख्या कठीण भूप्रदेशात लढण्याचा फारसा अनुभव नाही, असेही सीडीएस रावत यांनी सांगितले.

रावत
रावत

नवी दिल्ली -मागील वर्षी भारत-चीनचे सैन्य आमनेसामने उभे होते. भारतीय सैन्यासोबत झालेल्या धुमश्चक्रीत चीनचे काही सैन्य मारले गेले. या घटनेनंतर लगेचच आपले सैनिक शहीद झाल्याची माहिती जारी केली होती. मात्र चीनने उशीराने सैन्य ठार झाल्याची कबुली देत त्यांची माहितीही सार्वजनिक केली होती. या घटनेला आता एक वर्ष पूर्ण होत आहे. भारतासोबत झालेल्या संघर्षानंतर अधिक चांगले प्रशिक्षण आणि तयारी आवश्यक असल्याची अनुभूती चिनी सैन्याला झाल्याचे संरक्षण प्रमुख (चीफ ऑफ डिफेन्स) बिपिन रावत यांनी सांगितले. चिनी सैनिक प्रामुख्याने अल्प कालावधीसाठी भरती केले जातात. त्यांना हिमालयासारख्या कठीण भूप्रदेशात लढण्याचा फारसा अनुभव नाही, असेही सीडीएस रावत यांनी सांगितले.

'भारत सीमेवर चिनी सैन्याच्या तैनातीत बरेच बदल झाले आहेत. गतवर्षी मे आणि जूनमध्ये झालेल्या संघर्षानंतर त्यांना कळून चुकले आहे, की त्यांना अधिक चांगले प्रशिक्षण आणि तयार करणे आवश्यक आहे. गलवान खोऱ्यातील चकमकीत चिनी सैन्याला मोठे नुकसान सहन करावे लागले. चीनी सैनिक मुख्यत: नागरी भागातून येतात. अल्प कालावधीसाठी त्यांची नावे नोंदविली जातात. त्यांना हिमालयासारख्या भागात लढा देण्याचा आणि या प्रकारच्या भूप्रदेशात काम करण्याचा फारसा अनुभव नाही, असे रावत यांनी सांगितले.

सध्या भारत सीमेवर चीनच्या कारवायांवर बारीक नजर ठेवून आहे आणि कोणत्याही हालचालीला प्रतिसाद देण्यास सक्षम आहे. तिबेटी स्वायत्त प्रदेश एक अतिशय कठीण क्षेत्र आहे. हे पूर्णपणे पर्वतीय क्षेत्र आहे. यासाठी विशेष प्रशिक्षण आवश्यक आहे. यात भारतीय सैनिक निपुण आहेत. याचे कारण म्हणजे डोंगराळ भागात बरेच युद्धाचे प्रशिक्षण दिले जाते. या भागात ऑपरेशन्स होत असतात तसेच सैन्यांची उपस्थिती कायम असते, असे रावत यांनी सांगितले.

गलवान खोऱ्यातील झटापट -

15 जून 2020 रोजी गलवान खोऱ्यात झालेल्या धुमश्चक्रीत भारतीय सैन्यदलाचे 20 जवान शहीद झाले होते. भारत-चीन सैन्यादरम्यानचा गेल्या चार दशकांतील हा सर्वात हिंसक तणाव होता. भारताने या घटनेनंतर लगेचच आपले सैनिक शहीद झाल्याची माहिती जारी केली होती. मात्र, चीनने याविषयी कसलिही अधिकृत माहिती जारी केलेली नव्हती. मात्र, घटनेच्या अनेक दिवसानंतर चीनने आपले जवान ठार झाल्याची कबुली देत जवानांची माहितीही सार्वजनिक केली होती. दरम्यान, 10 फेब्रुवारी रोजी प्रकाशित केलेल्या एका वृत्तात रशियन वृत्तसंस्था टासने गलवान खोऱ्यातील धुमश्चक्रीत चीनचे 45 जवान ठार झाल्याचे म्हटले होते. तणाव निवाळण्यासाठी भारत आणि चीनमध्ये लष्कराच्या कॉर्प्स कमांडर स्तरावरील बैठका पार पडल्या आहेत. तर काही काही मुद्दे सीमावादात राहीले आहेत, त्यांच्यावरही चर्चा सुरू आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details