नवी दिल्ली - श्रद्धा खून प्रकरणी (Shraddha murder case) केसची सुरक्षा आणि संवेदनशीलता लक्षात घेऊन आरोपी आफताब पूनावाला (Aftab Poonawala) याच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर होण्याच्या अर्जाला परवानगी देण्यात आली. (Aftab Poonawala in court video conferencing). आता त्याला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे न्यायालयात हजर केले जाणार आहे. त्याच बरोबर कोर्टाने आरोपी आफताब पूनावाला याची नार्को टेस्ट घेण्याची देखील परवानगी दिली आहे. दिल्ली पोलीसांनी आफताबची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली होती.
खुनाचा गुन्हा दाखल : 5 महिन्यांपूर्वी दिल्लीत 26 वर्षीय लिव्ह-इन पार्टनर (live in partner murder case) श्रद्धा वॉकरची हत्या (shraddha walker murder case Delhi) करून मृतदेह गायब केल्याचा आरोप असलेल्या आफताब अमीन पूनावाला याला अटक (Aftab amin poonawa arrested) करण्यात आली. त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आफताबने श्रद्धाची हत्या करून (Aftab killed shraddha Walkar) तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे केले (shraddha walker body dismembered) आणि दिल्लीतील विविध भागात फेकून दिले.
दोघांचे होते प्रेमसंबंध -वसईच्या संस्कृती काँप्लेक्समधील राहणाऱ्या श्रद्धा वालकरचे ( Shraddha Walkar Murder Case ) वय (२७) त्याच परिसरात राहणाऱ्या आफताब पुनावाला ( Aftab killed shraddha Walkar) याच्यासोबत प्रेम होते. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या दोघांनी लग्नही केले होते. पण मुलीच्या घरच्यांना दुसऱ्या जातीत लग्न केल्याने तिच्यासोबत पटत नसल्याने भांडणे सुरू होती. यानंतर दोघेही एव्हरशाईन येथे राहायला गेले होते. त्यानंतर दोघेही मे महिन्यात दिल्ली येथे राहण्यासाठी गेले होते.
शरीराचे केले ३५ तुकडे -आफताब याने १८ मे ला श्रद्धाचा गळा आवळून हत्या ( Delhi Murder Case ) केली होती. नंतर तिचे शरीराचे ३५ तुकडे करून जंगलात फेकल्याचेही सूत्रांकडून कळते. मृतदेहाचे तुकडे तुकडे करण्यात आले होते. दुर्गंधी येऊ नये म्हणून आफताबने एक मोठा फ्रीझर विकत घेतला. त्यात शरीराचे तुकडे ठेवले. अधूनमधून तो एकेक अंग पिशवीत ठेवायचा, महारौलीच्या जंगलात नेऊन टाकायचा. तो प्रेताचे छोटे तुकडे करायचा, जेणेकर मानवी अवशेष आहेत हे कोणालाही कळणार नाही
हत्या केल्याची कबुली - माणिकपूर पोलिसांनी १२ ऑक्टोबरला मिसिंग दाखल करून तपासाला सुरुवात केली. या मिसिंग प्रकरणी ७ नोव्हेंबरला गुन्हे प्रकटीकरण शाखचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन सानप टीमसह चौकशी तपासाला गेले होते. यानंतर दिल्ली पोलिसांसोबत आरोपी आफताब याला ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर तपासात त्याने हत्या केल्याची कबुली दिली आहे. श्रद्धा हिच्या शरीराच्या तुकडे जंगलात पुरले असून दिल्ली पोलिसांना अद्याप पर्यंत पुरावे सापडले नसल्याचेही पोलीस सूत्रांकडून कळते.