नवी दिल्ली : 100 आफ्रिकन नागरिकांच्या हिंसक जमावाने शनिवारी काही दिल्ली पोलिस अधिकार्यांवर हल्ला केला. (African nationals attack Delhi Police). त्यानंतर काही तासांनी पोलिसांनी भारतात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या तीन नायजेरियन नागरिकांना अटक केली. हा हल्ला नेब सरायच्या राजू पार्कमध्ये झाला होता. प्रथम अटकेच्या वेळी आणि पुन्हा जेव्हा पोलिस पथकाने या भागाला भेट दिली तेव्हा दुसऱ्यांदा हा हल्ला करण्यात आला. (African attack Police)
व्हिसाची मुदत संपली होती :एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, अंमली पदार्थ सेलचे एक पथक शनिवारी राजू पार्कमध्ये परदेशी नागरिकांवर कारवाई करण्यासाठी गेले होते. दुपारी 2:30 च्या सुमारास टीमने तीन आफ्रिकन नागरिकांना पकडले. या नागरिकांची व्हिसाची मुदत संपली होती, असे ते म्हणाले. 'टीम त्यांना पोलीस ठाण्यात आणण्याचा प्रयत्न करत होती, परंतु अचानक सुमारे 100 आफ्रिकन नागरिक तेथे जमले आणि त्यांनी पोलीस पथकाला अडथळा आणला. दरम्यान, ताब्यात घेतलेल्या आफ्रिकन नागरिकांपैकी दोन जण पळून जाण्यात यशस्वी झाले. नंतर, त्यापैकी एकाला पकडण्यात यश आले', असे अधिकाऱ्याने सांगितले.