काबूल (अफगाणिस्तान)-तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेतले आहे. सत्ता हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे अफगाणिस्तान सरकारने तालिबानसमोर गुडघे टेकले आहेत. अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांनी अराजकता आणि बिघडलेल्या परिस्थितीमुळे रविवारी (१५ ऑगस्ट) राजीनामा दिला आहे. इतकेच नव्हे तर राष्ट्रपती अशरफ गनी हे देश सोडला पळून गेले आहेत. याबाबतची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. तर, ते ताजिकिस्तानला रवाना झाले असल्याची माहिती मिळत आहे. असे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, अफगाणिस्तानमधील देशवासी आणि तेथील परदेशी नागरिकही तेथून बाहेर पडू लागल्याचे चित्र आहे. कारण, देशातील रस्त्यांवर वाहनांची तूफान गर्दी दिसत आहे.
देव घनी यांना माफ करणार नाही - अब्दुल्ला अब्दुल्ला
पत्रकारांना माहिती देण्याचे अधिकार नसल्यामुळे नाव न छापण्याच्या अटीवर बोलताना दोन अधिकाऱ्यांनी असोसिएटेड प्रेसला सांगितले, की गनी देशातून बाहेर गेले आहेत. अफगाणिस्तान राष्ट्रीय सलोखा परिषदेचे प्रमुख अब्दुल्ला अब्दुल्ला यांनीही नंतर खात्री केली. नंतर ते म्हणाले, की “घनी यांनी कठीण काळात देशाला सोडून पळ काढला. देव त्यांना माफ करणार नाही. देवाला त्यांना उत्तर द्यावे लागेल”.
रविवारच्या टोलोच्या बातमीनुसार, राष्ट्रपती घनी यांनी त्यांच्या सहाय्यकांसह अफगाणिस्तान सोडले असल्याचे समजते आहे.