नवी दिल्ली -भारत आणि अफगाणिस्तानदरम्यान आतापर्यंतच चांगले द्विपक्षीय संबंध होते. मात्र, आता तालिबानी हातात सत्ता गेल्यानंतर परिस्थिती बदलली आहे. इतिहास पाहिला तर भारतासोबत तालिबान्यांचे संबंध कधीच चांगले राहिलेले नाहीत. सध्या भारत सरकारने सध्या अफगाणिस्तानातील बदलत्या राजकीय परिस्थितीवर मौन बाळगण्याचा निर्णय घेतला आहे. या संपूर्ण परिस्थितीवर माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंह यांनी आपले मत मांडले आहे. तालिबान अफगाणिस्तानमध्ये जबाबदार सरकारसारखे वागत असेल तर भारताने त्यांच्याशी राजनैतिक संबंध प्रस्थापित करावेत, असे ते म्हणाले.
यूपीए-1 सरकारमध्ये परराष्ट्र मंत्री असलेले नटवर सिंह यांनी अनेक वरिष्ठ राजनैतिक पदांसह पाकिस्तानमध्ये भारताचे राजदूत म्हणूनही काम केले आहे. तालिबान युद्धग्रस्त देशात विकासात्मक आणि जबाबदार सरकार म्हणून काम करत असेल. तर त्यांच्याशी राजनैतिक संबंध प्रस्थापित करण्याचे मी समर्थन करतो.
सत्ता काबीज करणारे तालिबानी सक्षम -
भारताने सध्या 'पाहणे आणि प्रतीक्षा करणे' (wait and watch) धोरण स्वीकारावे. गेल्या दोन दशकांपासून अफगाणिस्तानवर राज्य करणाऱ्यांपेक्षा सत्ता काबीज करणारे तालिबानी सक्षम दिसतात, हे लक्षात घेतले पाहिजे. भारताचे अफगाणिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांच्यासोबत घनिष्ठ संबंध होते. मात्र, आता त्यांच्या हाती सत्ता नसून परिस्थिती खूप वेगाने बदलली आहे, असे नटवर सिंह म्हणाले.
भारताची अफगाणिस्तानात तीन अब्ज डॉलर्सची गुंतवणूक -