पटना - माजी मंत्री आणि युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) सध्या बिहारची राजधानी पाटण्यात आहेत. येथे त्यांनी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची त्यांच्या राबडी या निवासस्थानी भेट घेतली (Aditya Thackeray meet Tejashwi Yadav). दोघांमध्ये बराच वेळ चर्चा झाली. तेथून दोन्ही नेते मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाकडे रवाना झाले. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आदित्य ठाकरे आणि नितीश कुमार यांच्यात चर्चा झाली. आदित्य ठाकरे यांच्यासोबत राज्यसभा खासदार अनिल देसाई आणि प्रियांका चतुर्वेदीही आहेत.
Aditya Thackeray : आदित्य ठाकरेंचा बिहार दौरा, तेजस्वी यादव यांची घेतली भेट - Aditya Thackeray
आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यासोबत खासदार आणि पार्टी सचिव अनिल देसाई व उपनेत्या प्रियांका चतुर्वेदी हे देखील गेले आहेत. तथापि, या बैठकीसाठी कोणताही राजकीय अजेंडा ठरला की नाही, यावर भाष्य करण्यास पक्षाच्या नेत्यांनी नकार दिला. (Aditya Thackeray meet Tejashwi Yadav).
लालू यादव यांच्या जीवनावरील पुस्तक भेट - या दरम्यान तेजस्वी यांनी लालू यादव यांच्या जीवनावर लिहिलेले पुस्तक आदित्य ठाकरे यांना भेट दिले. तत्पूर्वी, उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या भेटीच्या प्रश्नावर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी मुंबई विमानतळावर पत्रकारांशी बोलताना सांगितले की, ही एकाच वयाच्या दोन नेत्यांची भेट आहे. आम्ही अनेकदा फोनवर बोललो आहोत, पण आज वैयक्तिक भेट होईल.
पक्षाचे दोन खासदारही सोबत - आदित्य ठाकरे यांच्यासोबत खासदार आणि पार्टी सचिव अनिल देसाई व उपनेत्या प्रियांका चतुर्वेदी हे देखील गेले आहेत. तथापि, या बैठकीसाठी कोणताही राजकीय अजेंडा ठरला की नाही यावर भाष्य करण्यास पक्षाच्या नेत्यांनी नकार दिला.