नवी दिल्ली : हिंदू धर्मात अधिक मास (पुरुषोत्तम मास) मध्ये येणाऱ्या अमावस्याला विशेष महत्व असते. ही अमावस्या 3 वर्षानंतर एकदा येत असते. आज ही अमावस्या आपण या अमावस्येचे महत्त्व आणि पूजा विधी जाणून घेणार आहोत. याविषयी ज्योतिषाचार्य शिव कुमार शर्मा सांगतात की, अधिक मास अमावस्येच्या दिवशी हा महिना (धोंड्याचा महिना) संपत असतो. यानंतर श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाची सुरुवात होत असते. यादिवशी पितरांसाठी पूजा, दान केल्यास आपल्याला त्याचा फायदा होत असतो.
- तिथी आणि शुभ मुहूर्त: अधिक मास अमावस्येची तिथी 15 ऑगस्ट (मंगळवार) दुपार 12.42 मिनिटांपासून सुरू. आज 16 ऑगस्ट दुपारी 3 वाजून 7 मिनिटांपर्यंत असेल. उदया तिथीनुसार अधिक मास अमावस्या आज साजरी केली जाईल.
पूजा विधी : अधिक मास अमावस्येच्या दिवसी ब्रह्म मुहूर्तमध्ये उठून पवित्र नदीत आंघोळ करावी. जर कसे करणे शक्य नसेल तर घरी आंघोळ करताना गंगेचे पाणी आंघोळीच्या पाण्यात टाका. त्यानंतर सूर्यदेवाला एक तांब्याचे पात्र किंवा चांदीच्या पात्राने पाणी अर्पण करा. त्यानंतर महादेव आणि देवी पार्वतीची पूजा करावी. पूजा झाल्यानंतर आपल्या योग्यतेनुसार वस्त्र, धान्य, फळे इत्यादी गोष्टी ब्राह्मणांना दान कराव्यात.
- या गोष्टी ठेवा डोक्यात : अधिक मास अमावस्येच्या दिवशी म्हणजे आज केस,नखे कापू नये. मान्यतेनुसार, अमावस्या, चतुर्थी, पौर्णिमा आणि एकादशीच्या दिवशी कुमारवस्थेचे पालन करावे. कोणत्या नव्या कामाची सुरुवात करू नये. जर तुम्ही या दिवशी नव्या कामाला सुरुवात केली तर तुम्हाला त्यातून फायदा मिळत नाही.