नवी दिल्ली -माजी पत्रकार आणि मानवाधिकार कार्यकर्ते आकार पटेल यांना बंगळुरू विमानतळावर ( Activist Aakar Patel stopped from leaving India ) देश सोडण्यापासून रोखण्यात आले. याबाबत पटेल यांनी ट्विटरवर माहिती दिली. बंगळुरू विमानतळावर देश सोडण्यापासून मला थांबवले. मी एक्झिट कंट्रोल लिस्टमध्ये आहे. यूएस च्या ट्रिपसाठी कोर्टाच्या आदेशाद्वारे पासपोर्ट परत मिळवला होता. सीबीआयने लिस्टमध्ये टाकल्याचे इमिग्रेशन म्हणाले. पण असे का? असा प्रश्न ट्विटद्वारे पटेल यांनी केला.
हेही वाचा -Online Classes Impact : ऑनलाइन अभ्यासामुळे मुलांमध्ये नैराश्य! पालकांनो काळजी घ्या...
अॅमनेस्टी इंटरनॅशनल इंडियाविरुद्ध मोदी सरकारने केस दाखल केली आहे. त्यामुळे, मी लूक-आऊट सर्क्युलरवर आहे, असे सीबीआय अधिकाऱ्याने सांगितल्याची माहितीही पटेल यांनी दिली.