रामनगर (कर्नाटक) : कर्नाटकच्या रामनगर जिल्ह्यात एक अमानुष प्रकार उघडकीस आला आहे. प्रेमाला नकार दिल्याने एका तरुणाने अल्पवयीन मुलीवर अॅसिड हल्ला केल्याची घटना कनकापुरा शहरातील नारायणप्पा तलावाजवळ घडली. काल रात्री ८-९ च्या सुमारास एका २२ वर्षीय तरुणाने १७ वर्षीय तरुणीवर अॅसिड हल्ला केला.
मुलीच्या डोळ्याला दुखापत : अॅसिड हल्ल्यात मुलीच्या डाव्या डोळ्याला जबर दुखापत झाली असून तिला पुढील उपचारासाठी बंगळुरूला पाठवण्यात आले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव सुमंत असे आहे. सुमंत हा कार मेकॅनिक म्हणून काम करत असून त्याचे त्याच्या गॅरेजजवळील एका मुलीवर प्रेम होते. ती मुलगी रोज गॅरेजमधून कॉलेजला जायची. सुमंत हा कॉलेजला जाताना तिचा पाठलाग करायचा. काल रात्री 8-9 च्या सुमारास कनकपूर तालुक्यातील बायपास रोडवरील नारायणप्पा तलावाजवळ त्याने मुलीला कोपऱ्यात नेऊन तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. तिने यास विरोध केल्यानंतर त्याने तिच्या चेहऱ्यावर अॅसिड फेकले आणि तेथून पळ काढला.
आरोपीला अटक : हल्यानंतर स्थानिक लोकांनी पीडित मुलीला तातडीने रुग्णालयात दाखल केले आणि पोलिसांना प्रकरणाची माहिती दिली. अॅसिड हल्ल्यात मुलीच्या डाव्या डोळ्याला जबर दुखापत झाली असून तिला पुढील उपचारासाठी बंगळुरूला पाठवण्यात आले आहे. डॉक्टरांनी अद्याप तिच्या प्रकृतीबाबत कोणताही अहवाल दिलेला नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास केला. एसपी कार्तिक रेड्डी यांनी घटनास्थळी भेट देऊन मुलीच्या प्रकृतीची माहिती घेतली. कनकापुरा टाउन पोलिस स्टेशनमध्ये पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेनंतर लगेचच आरोपीला अटक करण्यात आली आहे.
उच्च न्यायालयाने जामीन नाकारला :अल्पवयीन मुलीने प्रेमाची कबुली न दिल्यास तिच्या चेहऱ्यावर अॅसिड टाकण्याची धमकी दिल्याच्या प्रकरणी उच्च न्यायालयाने तरुणाला जामीन देण्यास नकार दिला आहे. हसन जिल्ह्यातील अर्सिकेरे तालुक्यातील होस्कलनायकनकहल्ली येथील पवन (२६) याने दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती एम.जी. यांनी सुनावणी केली. त्याला अल्पवयीन मुलीला धमकावल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
हेही वाचा :Kanpur Dehat Incident : महिनाभरापूर्वीच कुटुंबियांनी केली होती डीएमकडे तक्रार, अधिकाऱ्यांची विनवणी करतानाचा व्हिडिओ आला समोर