महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Mathura Train Accident : ट्रेन प्लॅटफॉर्मवर चढण्याआधी लोको पायलटचा सुरू होता व्हिडिओ कॉल, पाच जण निलंबित

Mathura Train Accident : मथुरा जंक्शनवर ट्रेन प्लॅटफॉर्मवर चढल्याप्रकरणी लोको पायलटसह पाच कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. या घटनेचा एक सीसीटीव्ही व्हिडिओही समोर आला आहे. यामध्ये लोको पायलट इंजिन चेंबरमध्ये व्हिडिओ कॉल करताना दिसत आहे.

Mathura Train Accident
Mathura Train Accident

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 28, 2023, 5:28 PM IST

मथुरा जंक्शनवर ट्रेन प्लॅटफॉर्मवर चढली

मथुरा Mathura Train Accident : मंगळवारी रात्री उशिरा मथुरा जंक्शनवर ईएमयू ट्रेन प्लॅटफॉर्मवर चढल्याच्या प्रकरणानं जोर पकडला आहे. या संपूर्ण प्रकरणात रेल्वेनं कारवाई केली आहे. रेल्वेनं लोको पायलटसह पाच जणांना निलंबित केलं आहे. तसेच तपासाची जबाबदारी चार सदस्यीय पथकाकडं सोपविण्यात आली आहे.

लोको पायलटसह पाच जणांना निलंबित :उत्तर मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकारी प्रशिस्त श्रीवास्तव यांनी सांगितलं की, या संपूर्ण प्रकरणात लोको पायलट गोविंद हरी शर्मा, हेल्पर इलेक्ट्रीशियन सचिन, तंत्रज्ञ कुलजीत, ब्रिजेश, हरवन कुमार यांना निलंबित करण्यात आलं आहे.

अशी घडली घटना :शनिवारी संध्याकाळी 6 वाजता, बस्तीहून शकूर बस्ती पॅसेंजर ईएमयू ट्रेन रात्री 10:59 वाजता मथुरा जंक्शनला पोहोचली. प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर पोहोचल्यावर सर्व प्रवासी ट्रेनमधून उतरले. यानंतर लोको पायलट आणि कर्मचारी यांच्याकडून इंजिनची देखभाल केली जात होती. यासोबतच तांत्रिक बिघाड तर नाही ना याचीही तपासणी करण्यात येत होती. दरम्यान, लाइटिंग कर्मचार्‍याने इंजिन चेंबरमध्ये प्रवेश केला. त्यानंतर ट्रेनचे इंजिन अचानक धिम्या गतीनं धावू लागलं. जिथे इंजिन रेल्वे ट्रॅकऐवजी फलाट क्रमांक 2 वर पोहोचलं. यादरम्यान एका जड लोखंडी खांबाला धडकल्यानं रेल्वेचे इंजिन थांबलं. अन्यथा मथुरा जंक्शनवर मोठी दुर्घटना घडू शकली असती. मंगळवारी रात्री उशिरा हा व्हिडिओ सीसीटीव्हीच्या माध्यमातून समोर आला. यानंतर रेल्वे अधिकाऱ्यांमध्ये घबराट पसरली.

  • तपास सुरू : त्याच वेळी, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी वरिष्ठ डीईई ओपी योगेश कुमार, वरिष्ठ डीएसओ रघुनाथ सिंह, वरिष्ठ डीईई विवेक गुप्ता आणि वरिष्ठ डीईई प्रवीण कुमार यांची समिती स्थापन करण्यात आली आहे, जी चौकशी करून अहवाल सादर करेल.

नागरिकांसाठी कुतूहलाचा विषय : तत्पूर्वी क्रेनच्या सहाय्यानं प्लॅटफॉर्म दोनवरून रेल्वेचं इंजिन हटवण्यात आलं आहे. फलाटावर आलेलं इंजिन प्रवाशांच्या सेल्फीचं, कुतूहलाचा विषय बनला आहे. दिल्लीतील शकूर बस्ती येथून मथुरा जंक्शनसाठी निघालेली ईएमयू ट्रेन मंगळवारी रात्री उशिरा मथुरा जंक्शनवर रुळावरून घसरून प्लॅटफॉर्मवर चढली होती.

हेही वाचा -

  1. Rail Roko Movement In Punjab : पंजाबमधील रेल रोको आंदोलनात खलिस्तानवाद्यांच्या सहभागाची शक्यता; रेल्वेसह गुप्तचर विभाग सतर्क
  2. Kejriwal bungalow renovation case : मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ, बंगला नूतनीकरण प्रकरणाचा सीबीआय तपास सुरू
  3. Oscars 2024 : ज्यूड अँथनी जोसेफ दिग्दर्शित '2018-एव्हरीवन इज अ हिरो'चे ऑस्करसाठी नामांकन

ABOUT THE AUTHOR

...view details