कोलकाता -काही दिवसापूर्वी पार पडलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाने भारतीय जनता पक्षाचा धुव्वा उडवत सत्ता काबीज केली. भाजपा आणि काँग्रेसचे अनेक नेते तृणमूल काँग्रेसची वाट धरत आहेत. बंगालमधील काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे पुत्र आणि काँग्रेस नेते अभिजित मुखर्जी आज टीएमसीमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. टीएमसीच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत अभिजीत आज संध्याकाळी टीएमसीत सामील होतील.
अभिजित मुखर्जी यांनी काही दिवसांपूर्वी टीएमसीच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली होती. तसेच अभिजीत यांनी बनावट लस प्रकरणात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पाठिंबा दर्शविला होता. 'विशिष्ट व्यक्तीच्या चुकीच्या कृतीसाठी पश्चिम बंगाल आणि ममता बॅनर्जी यांना जबाबदार धरणे योग्य नाही. जर तसे असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही मेहुल चोक्सी, नीरव मोदी आणि विजय मल्ल्याच्या खटल्यांसाठी जबाबदार धरता येईल, असे टि्वट त्यांनी केले होते.
राजकारणात येण्यापूर्वी सरकारी सेवेत -