महाराष्ट्र

maharashtra

आपचे खासदार संजय सिंह यांनी शेअर केला पंतप्रधान मोदींचा कोविंद यांच्या निरोपाचा वादग्रस्त व्हिडिओ, वर्मा यांनी घेतला समचार

By

Published : Jul 25, 2022, 10:31 AM IST

राष्ट्रपतींच्या निरोप समारंभाशी संबंधित व्हायरल झालेल्या संपादित व्हिडिओवरून आप नेते संजय सिंह यांनी भाजपवर टीकाकेली आहे. त्यावर खासदार परवेश वर्मा यांनी त्यांचा खरपूस समाचार घेतला.

कोविंद यांच्या निरोपाचा वादग्रस्त व्हिडिओ
कोविंद यांच्या निरोपाचा वादग्रस्त व्हिडिओ

नवी दिल्ली: माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये असा दावा केला जात आहे की, पीएम मोदींनी निरोप समारंभात रामनाथ कोविंद यांच्याकडे दुर्लक्ष केले. या व्हिडिओवरुन आप नेते आणि राज्यसभा सदस्य संजय सिंह यांनी भाजवपर टीका केली. त्यांनीही तो ट्विटरवर शेअर केला आहे.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत ते म्हणाले, 'असा अपमान, माफ करा सर, हे लोक असे आहेत. तुमचा कार्यकाळ संपला, आता तुमच्याकडे ढुंकूनही पाहणार नाही. संजय सिंह यांनी असे म्हटल्यानंतर काही वेळातच भाजप खासदारांनीही त्यावर तिखट प्रतिक्रिया दिले. ते म्हणाले, 'संजय जी, तुम्हाला अजिबात लाज वाटत नाही का? मोदीजींच्या विरोधात तुम्ही किती खालच्या थराला गेला? केजरीवाल टोळी नाक घासून माफी मागते, पण तरीही ते खोटे बोलण्यापासून परावृत्त होत नाहीत.'

व्हिडिओशी छेडछाड करून पंतप्रधानांची बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. या संदर्भात, त्यांनी दोन व्हिडिओ शेअर केले आहेत. ज्यात एक व्हिडिओ मूळ असल्याचा दावा केला आहे, ज्यामध्ये मोदी निरोप समारंभात निवर्तमान राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांना हात जोडून अभिवादन करताना दिसत आहेत. त्याचवेळी, संपादित व्हिडिओमध्ये पंतप्रधान निवर्तमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details