चंदीगड- आम आदमी पक्षाने 88 हून अधिक जागांवर आघाडी मिळविली ( AAP in punjab ) आहे. दुसरीकडे 59 हा बहुतमाचा आकडा ( AAP crosses majority mark ) आहे. पंजाब विधानसभेच्या 117 जागांसाठी निवडणूक होत आहे. काँग्रेसचे नवज्योत सिंग सिद्धू, हे पूर्व अमृतसर मतदारसंघामध्ये दुसऱ्या क्रमांकार आहेत. या मतदारसंघात आपचे जीवन कौर पहिल्या क्रमांकावर आहेत. तर शिरोमणी अकाली दलाचे विक्रम मजिठिया हे तिसऱ्या क्रमांकावर आहेत. पटियाला विधानसभा निवडणुकीत पंजाब लोक काँग्रेसचे अमरिंदर सिंग हे पिछाडीवर आहेत. दुसरीकडे पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांची चमकौर मतदारसंघामध्ये पिछेहाट होत आहे.
साडेअकरा वाजताचे अपडेट
INC | AAP | SAD+ | BJP+ | OTH |
---|---|---|---|---|
11 | 88 | 12 | 5 | 1 |
दिल्लीनंतर पंजाबमध्ये आपला बहुमत मिळण्याची चिन्हे
निवडणूक आयोगाच्या आघाडीनुसार काँग्रेस 11 आघाडीवर ( Punjab Assembly poll result ) आहेत. तर त्यापाठोपाठ शिरोमणी दल हे 12जागांवर आघाडीवर आहेत. आम आदमी पक्षाला स्पष्ट बहुमत मिळण्याची चिन्हे आहेत. विशेष म्हणजे विविध सर्वेक्षणातून आम आदमी सत्तेत येईल, असा अंदाज वर्तविला होता. आपचे मुख्यमंत्रिपदाचे आमदार भगवंत मान हे धुरीमधून आघाडीवर आहेत. सकाळपासून त्यांच्या निवासस्थानी जिलेबी तयार करणे आणि फुलांची सजावट करण्याचे काम सुरू होते. दिल्लीनंतर पंजाब हे बहुमत मिळविलेले ( Punjab election news ) आपसाठी दुसरे राज्य असणार आहे. 2017 विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला केवळ 20 जागा होत्या. तर काँग्रेसला 77 जागांवर होत्या. तिसऱ्या क्रमांकाचा आप हा पहिल्या क्रमांकाची जागा घेत आहे.