महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

होम लोन पाहिजे म्हणत घरी बोलावून केले तरुणाचे अपहरण, मारहाण करत केला व्हिडिओ व्हायरल

राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील भिवाडी गाव होम लोन (गृह कर्ज) हवे आहे, असे सांगत तरुणाला बोलावले. त्यानंतर त्याचे अपहरण करुन त्याला मारहाण केली. एवढेच नाही तर त्याचा व्हिडिओ व्हायरल केला व त्याची सुटका करण्यासाठी त्यांनी पाच लाख रुपयांची मागणी केली आहे.

छायाचित्र
छायाचित्र

By

Published : Aug 4, 2021, 4:59 PM IST

जयपूर (राजस्थान) -अलवर जिल्ह्यातील भिवाडी यूआईटीच्या फेज तीन क्षेत्रातील एका गावात दोन तरुण व एका महिलेने एका युवकाचे अपहरण करुन त्याला डांबून ठेवले आहे. एवढेच नाही तर युवकाचे कपडे काढून त्याला मारहाणही केली. दिनेश, असे त्या तरुणाने नाव आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून भिवाडी औद्यागिक क्षेत्राजवळील सांथलका गावाचा असल्याचे सांगितले जात आहे. ही घटना एक ऑगस्टची असल्याचे सांगितले जात असून मंगळवारी (दि. 3 ऑगस्ट) या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

माहिती देताना पोलीस अधिकारी

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दिनेशच्या कुटुंबियांनी मंगळवारी भिवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्ररीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल करत दोघांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पहाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या गंगोरा गावातील एक दिनेशला एक महिला व दोन तरुणांनी डांबून ठेवले होते. त्यानंतर संशयितांनी तरुणाने कपडे काढून त्याला मारहाण करत त्याचा व्हिडिओ बनवला व तो व्हायरल केला. पोलिसांनी एकाला घटनास्थळावरुन ताब्यात घेतले आहे.

दिनेशने फोटो व्हायरल केल्याचा महिलेचा आरोप

महिलेचा नाव लिहून फोटो व्हायरल करुन चांगले केले नाही, असे ती महिला दिनेशशी बोलत असल्याचे व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे. तर दिनेश महिलेचा फोटो व्हायरल केला नसल्याचे सतत सांगत आहे.

कुटुंबियांनी दिली तक्रार

पीडित तरुणाच्या भावाने भिवाडी पोलीस ठाण्यात महिला व त्याच्या दोघा साथिदारांविरोधात तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, त्याचा भाऊ दिनेश रामगड येथे बहिणीसोबत राहतो व तो अलवर येथे होम लोन विभागत (गृह कर्ज) काम करतो. 1 ऑगस्टला त्याच्या मोबाईवर होम लोनसाठी फोन आला. त्याला भिवाडीच्या सांथलका येथे बोलविण्यात आले. त्यानंतर दिनेश हा आपल्या दुचाकीवरुन सांथलका येथे गेला.

मागितली पाच लाख रुपयांनी खंडणी

कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारीनुसार होम लोनसाठी सांथलका गावात दिनेशला बोलवण्यात आले होते. त्या ठिकाणी त्याला एक महिला व दो तरुण भेटले. त्यानंतर आम्ही तुला लोनसाठी नाही तर बंधन बनविण्यासाठी बोलवल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी दिनेशचे हाथ-पाय बांधून त्याला नग्न करुन मारहाण करत त्याचा व्हिडिओ बनवला. व्हिडिओ व्हायरल न करणे व दिनेशला सोडण्यासाठी पाच लाख रुपयांची खंडणी मागीतली, असे तक्रारीत म्हटले आहे.

हेही वाचा -डिझेलचा आला महापूर, हाती सापडेल ते भांडे घेऊन धावले लोक... बघा VIDEO

ABOUT THE AUTHOR

...view details