बलरामपूर - पाचपेडवाच्या एका खासगी नर्सिंग होममध्ये दाखल झालेल्या महिलेने चार पाय, चार हात, दोन शरीर आणि दोन डोके असलेल्या एका मुलाला जन्म दिला आहे. ही बातमी पसरताच बाळाला पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली. तथापि, जन्मानंतर काही तासांतच मुलाचा मृत्यू झाला.
उत्तर प्रदेश : दोन डोके असलेल्या बाळाला जन्म, 9 तासानंतर मृत्यू - चार पाय-हात असलेल्या बाळाला जन्म
उत्तर प्रदेशच्या पाचपेडवामध्ये महिलेने चार पाय, चार हात, दोन शरीर आणि दोन डोके असलेल्या एका मुलाला जन्म दिला. तथापि, जन्मानंतर काही तासांतच मुलाचा मृत्यू झाला.
गीता देवी (30) या महिलेने चार पाय, चार हात, दोन शरीर आणि दोन डोके असलेल्या बाळाला जन्म दिला आहे. या बाळाच्या गळ्याचा भाग एकमेंकाशी जोडलेला होता, असे महिला डॉक्टर रोशन आरा यांनी सांगितले. जन्मानंतर काही तासांतच या मुलाचा मृत्यू झाला आहे.
दोन डोकी असणारे अशा प्रकारची प्रसूती होण्याचे प्रकार लाखातून एक असे आढळते. अशा घटना जगभरात घडलेल्या आहेत. गर्भात जर जुळी मुलं असतील आणि ती पूर्ण विकसित होऊ शकली नाही, तर अशा समस्या निर्माण होतात. भारतात अशा दोन डोके असलेल्या बाळांकडे वेगवेगळ्या पद्धतीने बघितलं जातं. कुणी त्यांना शुभ मानतात कुणी अशुभ, तर कुणी त्याला दैवी मानतात.