हैदराबाद - आंध्र प्रदेश हायकोर्टाने स्पष्ट केले आहे, की वेश्यालयात गेलेला ग्राहक फक्त ग्राहक आहे. त्यामुळे त्यांच्यावर खटला चालवला जाणार नाही. असे स्पष्ट मत आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने एका खटल्याचा निकाल देताना नोदंवले आहे.
आंध्र प्रदेश उच्च न्यायालयात एका याचिकाकर्त्याने सीआरपीसीच्या कलम 482 अंतर्गत फौजदारी याचिका दाखल करून त्याच्यावरील फौजदारी कारवाई रद्द करण्याची मागणी केली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी याचिकाकर्त्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आणि तपासानंतर दोषारोपपत्र दाखल केले, असे याचिकाकर्त्याने म्हटले आहे.