महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Self Marriage : तरुणी करणार स्वतःशीच विवाह, 'या' दिवशी घेणार सप्तपदी

गुजरातच्या वडोदरा येथे 11 जून रोजी एका विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या विवाह सोहळ्याला वऱ्डाडी, मंडप, नवरी सर्वकाही असणार आहे. पण, या लग्नात नवरदेव असणार नाही. कारण 24 वर्षीय तरुणी स्वतःशीच लग्न करणार आहे. क्षमा बिंदू, असे त्या तरुणीचे नाव आहे. तिच्याशी 'इटीव्ही भारत'च्या प्रतिनिधीने बातचित केली. त्यावेळी तिने मनमोकळ्यापणाने गप्पा मारल्या.

क्षमा बिंदू
क्षमा बिंदू

By

Published : Jun 2, 2022, 6:21 PM IST

Updated : Jun 2, 2022, 7:21 PM IST

वडोदरा (गुजरात) -गुजरातच्या वडोदरा येथे 11 जून रोजी एका विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या विवाह सोहळ्याला वऱ्डाडी, मंडप, नवरी सर्वकाही असणार आहे. पण, या लग्नात नवरदेव असणार नाही. कारण 24 वर्षीय तरुणी स्वतःशीच लग्न करणार आहे. क्षमा बिंदू, असे त्या तरुणीचे नाव आहे. तिच्याशी 'इटीव्ही भारत'च्या प्रतिनिधीने बातचित केली. त्यावेळी तिने मनमोकळ्यापणाने गप्पा मारल्या.

बोलताना क्षमा बिंदू

स्वतःशीच लग्न करण्याची ही पहिलीच घटना -क्षमा बिंदूच्या म्हणण्यानुसार अनेकांना नवरी बनून नटायची इच्छा असते पण कोणाची पत्नी व्हायचं नसते. अशीच माझीही इच्छा आहे. मी लहानपणापासूनच स्वतःवर खूप प्रेम करते. लहानपणापासूनच मी स्वतःला आरशात पाहून स्वतःशीच गप्पा मारत असे. माझ्या लग्नाबाबत मला खूप उत्सुकता आहे. पारंपारिक लग्नासारखे मला स्वतःशी लग्न करायचे आहे, असे क्षमा म्हणाली. तीने स्वतःच्या लग्नासाठी दागदागिने खरेदी केले असून कपडेही शिवायला दिली आहे. क्षमाच्या या आगळ्यावेगळ्या लग्नाची सगळीकडे चर्चा होत असून स्वतःशीच लग्न करण्याची पहिलीच घटना आहे.

हनिमूनला जाणार - 11 जूनला गोत्री येथील एका मंदिरात क्षमा स्वविवाह करणार आहे. तिने तिच्या काही खास मित्र मैत्रिणींना लग्नासाठी आमंत्रित केले आहे. लग्नानंतर सुटी मिळताच गोव्याला हनिमूनसाठी जाणार असल्याचेही तिने सांगितले. महाराजा सयाजीराव विद्यापीठातून तिने आपले पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे.

हेही वाचा -कुलगाममध्ये दहशतवाद्यांनी राजस्थानच्या बँक मॅनेजरची केली हत्या

Last Updated : Jun 2, 2022, 7:21 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details