नवी दिल्ली : अरविंद केजरीवाल यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शैक्षणिक पात्रतेवर निशाणा साधला आहे. आपला देश महान असून भारतासारख्या महान देशाचा पंतप्रधान सुशिक्षित असला पाहिजे, असे ते म्हणाले. 21व्या शतकातील तरुणांना विज्ञान आणि तंत्रज्ञानावर विश्वास आहे, त्यांना रोजगार हवा आहे आणि भारताचा विकास हवा आहे. त्यासाठी सुशिक्षित लोकांची गरज आहे. कमी शिक्षित आणि अशिक्षित लोक भारत सुधारू शकत नाहीत असही ते म्हणाले आहेत.
नोटाबंदीमुळे देशातील भ्रष्टाचार आणि दहशतवाद संपला नाही : भारत हा गरीब देश असून शिक्षण आणि निरक्षरता हा गुन्हा नाही, असे ते म्हणाले. गरिबीमुळे अनेकांना शिक्षणापासून वंचित राहावे लागले आहे. मात्र, पंतप्रधानांनी शिक्षण घेतले पाहिजे. पंतप्रधान सुशिक्षित नसतील तर ते देशासाठी घातक आहे. केजरीवाल यांनी नोटाबंदीचा मुद्दा उपस्थित केला आणि सांगितले की, नोटाबंदीमुळे देशातील लोकांमध्ये खोळंबा झाला. अनेक लोक बेरोजगार झाले. अनेकांचा व्यवसाय बुडाला आणि अनेकांचे मृत्यू झाले. नोटाबंदीमुळे देशाची अर्थव्यवस्था दहा वर्षे मागे गेली आहे. कोणीतरी पंतप्रधानांना यासाठी तयार केले होते आणि त्यांनी ते समजून न घेता अंमलात आणले. नोटाबंदीमुळे देशातील भ्रष्टाचार आणि दहशतवाद संपला नाही असही ते म्हणाले आहेत.
केजरीवाल यांनी आसामच्या मुख्यमंत्र्यांची खिल्ली उडवली: केजरीवाल यांनी मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांची खिल्ली उडवली आणि ते म्हणाले की, ज्या राज्यात मुख्यमंत्र्यांची पत्नी खासगी शाळा चालवते, तिथली सरकारी शाळा कधीच चांगली असू शकत नाही आणि तसेच, गरीबांना तीथे शिक्षण मिळत नाही असही ते म्हणाले आहेत. आसाममध्ये पहिल्यांदाच मोठ्या सभेला संबोधित करताना केजरीवाल यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीला आसामच्या जनतेला आसामी भाषेत संबोधित केले आणि माँ कामाख्याचे आशीर्वाद मागितले. श्रीमंत शंकरदेव, माधवदेव, विष्णुप्रसाद राभा, ज्योती प्रसाद आणि भूपेन हजारिका यांनी दिलेल्या योगदानाचा त्यांनी उल्लेख केला.
भाजप सरकारमध्ये अनेक लोक बेरोजगार : आसाममध्ये 50 लाख बेरोजगार असल्याचे ते म्हणाले. तरुण रोजगारासाठी हतबल आहेत. मात्र, मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा त्यांचे ऐकायला तयार नाहीत. आप सरकारने दिल्लीतील 12 लाख बेरोजगारांना रोजगार दिला आहे. आसाममध्ये तुमचे सरकार आल्यास प्रत्येक बेरोजगाराला रोजगार दिला जाईल. हिमंता बिस्वा सरमा यांनी ज्या वेगाने बेरोजगारांना रोजगार दिला आहे, त्या गतीने आसामची बेरोजगारी समस्या सोडवायला 100 वर्षे लागतील असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
हेही वाचा :Vajramuth Sabha : भाजपला सांगतो, शेंडी-जानव्याचे नाही तर राष्ट्रीयत्व हे आमचे हिंदूत्व -उद्धव ठाकरे