बालाघाट ( भोपाळ )- मध्य प्रदेशमधील सराफा व्यावसायिक ( Balaghat jewellery trader ) राकेश सुराणा, त्यांची पत्नी आणि मुलासह सुमारे 11 कोटींची मालमत्ता सोडून, 22 मे रोजी जयपूरमध्ये विधिवत दीक्षा घेणार आहेत. त्यांनी आपली मालमत्ता गोशाळा आणि इतर धार्मिक संस्थांना दान केली आहे. गुरु महेंद्र सागर यांच्या प्रेरणेने त्यांनी व त्यांच्या कुटुंबाने सांसारिक जीवनाचा त्याग करण्याचा निर्णय घेतला आहे. संयम आणि अध्यात्माच्या मार्गावर जाण्याचा (Balaghat jewellery trader take initiation in jaipur) निर्णय घेतला.
लोकांनी संपूर्ण सुराणा कुटुंबाची मिरवणूक काढली ( Balaghat jewellery trader take initiation ) आहे. राकेश सुराणा यांनी त्यांची 11 कोटींची मालमत्ता गोशाळा आणि धार्मिक संस्थांना दान केली. त्यांनी पत्नी लीना आणि 11 वर्षांचा मुलगा अमय यांच्यासह सांसारिक जीवनाचा त्याग करून संयमाचा मार्ग स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. दीक्षा घेण्यापूर्वी राकेश सुराणा (वय ४० वर्षे), त्यांची पत्नी लीना सुराणा (३६ वर्षे) आणि मुलगा अमय सुराणा (११ वर्षे) यांना शहरातील नागरिकांनी ( Balaghat jewellery trader news ) मिरवणूक काढून निरोप दिला.
जीवनाचा मूळ अर्थ स्वतःला ओळखणे - सराफा व्यापारी राकेश सुराणा म्हणाले, की पैसे मिळवणे म्हणजे केवळ आनंद घेणे नव्हे. जीवनाचा मूळ अर्थ स्वतःला ओळखणे हा आहे. कारण मानवी इच्छा कधीच संपू शकत नाहीत. गुरु महेंद्र सागर जी महाराज आणि मनीष सागर जी यांच्या प्रवचनात राहून मला धर्म, अध्यात्म आणि स्वरूप ओळखण्याची प्रेरणा मिळाली. माझ्या पत्नीने बालपणीच संयमाच्या मार्गावर जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्याचवेळी माझा मुलगा अमय सुराणा याने वयाच्या अवघ्या ४ व्या वर्षी संन्यासाच्या मार्गावर जाण्याचे ठरवले होते.
छोट्याशा दागिन्यांच्या दुकानातून व्यवसायाला सुरुवात -राकेश हे बालाघाटमध्ये सोन्या-चांदीच्या व्यवसायाशी निगडित आहेत. एकेकाळी छोट्याशा दुकानातून दागिन्यांचा व्यवसाय सुरू करणाऱ्या राकेशने आपल्या दिवंगत थोरल्या भावाच्या प्रेरणेने आपल्या मेहनतीमुळे आणि अथक प्रयत्नांमुळे या क्षेत्रात संपत्ती आणि प्रसिद्धी दोन्ही मिळविले. आधुनिकतेच्या या युगातील सुखी जीवनाच्या सर्व सोयी त्यांच्या कुटुंबात होत्या. त्यांनी कोट्यवधींची संपत्ती कमावली आहे. परंतु सुराणा कुटुंबीय वर्षानुवर्षे जमा केलेली संपत्तीचे दान करून अध्यात्माकडे वळत (Balaghat jewellery trader donate 11 crores property) आहेत.