चंदीगड - 'म्हातारपणात केवळ काठीचा आधार असतो. पण चंदीगडमध्ये राहणाऱ्या ९४ वर्षीय हरभजन कौर ( 94 Year Old Entrepreneur In Chandigarh ) यांनी स्टार्टअप हादेखील म्हतारपणात आधार असतो, हे दाखवून दिले आहे. त्या दर महिन्याला एक लाख रुपये कमवित आहेत. तुमच्यात एखादी गोष्ट करण्याची जिद्द असेल, तर तुमच्या वयात फरक पडत नाही, हे त्यांनी सिद्ध केले आहे.
हरभजन कौर यांनी 4 वर्षांपूर्वी म्हणजे वयाच्या 90 व्या ( 94 Years Old Lady Startup ) वर्षी स्वतःचा स्टार्टअप ( Harbhajan Kaur Besan Ki Barfi Startup ) सुरू केला. हा आज एक ब्रँड ( Harbhajan Kaur Besan Barfi ) बनला आहे. हरभजन कौर यांनी त्यांच्या व्यवसायाची सुरुवात बेसन बर्फी बनवून केली होती. पण आज त्या बेसनाच्या बर्फीसोबत लोणची, अनेक प्रकारच्या चटण्या आणि शरबतदेखील बनवतात. ही उत्पादने लोकांना खूप आवडतात.
आयुष्यभर एक रुपयाही कमावला नाही- ईटीव्ही भारतशी संवाद साधताना हरभजन कौर म्हणाल्या, की आज ९४ वर्षांचे झाली आहे. मनात नेहमीच एक इच्छा असायची की स्वतःसाठी काहीतरी काम करावे. कारण आयुष्यातील प्रत्येक जबाबदारी पार पाडली आहे. आई-वडिलांची काळजी घेणे असो, लग्न असो किंवा घरचे असो, जबाबदारी पार पाडली आहे. हरभजन म्हणाल्या की, या सगळ्यात मी स्वतःहून कधीच कोणतेही काम केले नाही. आयुष्यभर एक रुपयाही कमावला नाही. स्वत: काहीतरी काम करून आपल्या कामातून पैसा कमवावा, ही मनात एक अपूर्ण इच्छा होती. ते पूर्ण करण्यासाठी त्यांनी हा स्टार्टअप सुरू केला.
अशा प्रकारे सुरू झाले स्टार्ट-अप- आईचे वाढते वय पाहून एके दिवशी हरभजन कौर यांची मुलगी रवीना सूरीने तिला विचारले की तुला कुठे जायचे आहे? तेव्हा हरभजन कौर म्हणाल्या की, आजपर्यंत मी पैसे कमावले नाही, याचे मला वाईट वाटते. तेव्हा त्यांच्या मुलीने विचारले तुला काय करायचे आहे. तेव्हा हरभजन म्हणाल्या, की मी आयुष्यभर घरीच अन्न शिजविले आहे. बेसनाची बर्फी कशी बनवायची ते मला माहीत आहे. मला ते विकून पैसे कमवायचे आहेत. मी बनवलेली बेसन बर्फी कोणीतरी विकत घेईल. येथून स्टार्टअपचा पाया रचला गेला.
लोकांना बर्फी आवडल्या - सर्वप्रथम हरभजन कौर यांच्या मुलीच्या मदतीने बनवलेल्या बेसनाच्या बर्फी बाजारात लोकांना मोफत खायला दिल्या होत्या. लोकांना व दुकानदारांना बर्फी खूप आवडण्यास सुरुवात झाली. त्यानंतर बर्फीच्या ऑर्डर्स त्यांच्याकडे येऊ लागल्या. त्यांनी पहिल्या कमाईची तिन्ही मुलींमध्ये समान वाटणी केली. यानंतर आईचा छंद पूर्ण झाला, असे कुटुंबीयांना वाटले. आता आई विश्रांती घेईल, असे त्यांना वाटले