बेंगळुरू : कर्नाटकातील दावणगेरे दक्षिण मतदारसंघाचे 92 वर्षीय उमेदवार शमनूर शिवशंकरप्पा हे देशातील सर्वात वयस्कर विद्यमान आमदार आहेत. ते भारतीय जनता पक्षाचे बीजी अजय कुमार यांच्या विरोधात काँग्रेसचे उमेदवार म्हणून विधानसभा निवडणूक लढवत आहेत. यावेळी भाजपने लिंगायत समाजाचा उमेदवार उभा केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवशंकरप्पा यांनी दावणगेरे दक्षिण मतदारसंघातून सलग तीन निवडणुका जिंकल्या आहेत.
भाजपच्या उमेदवाराविरुद्ध निवडणूक लढवणार :दावणगिरीचे आमदार म्हणून ते पाच वेळा निवडून आले आहेत. ते वीरशैव लिंगायत महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. भाजपच्या उमेदवाराविरुद्ध चौथ्यांदा निवडणूक लढवणार आहेत. शिवशंकरप्पा यांनी 1994 मध्ये राजकारणात पदार्पण केले आणि प्रथमच दावणगेरे नगरपरिषदेचे अध्यक्ष बनले. पुढे 1994 मध्ये त्यांनी दावणगेरे विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि विधानसभेत प्रवेश केला. 2004 मध्ये त्यांनी पुन्हा त्याच मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि विजयी झाले. 2008 मध्ये मतदारसंघाचे विभाजन झाले. ते 1994, 2004, 2008, 2013 आणि 2018 मध्ये दावणगेरे दक्षिण मतदारसंघातून पाच वेळा आमदार म्हणून निवडून आले.