सॅन फ्रान्सिस्को :सेल्सफोर्सचे सीईओ मार्क बेनिऑफ यांनी कबूल केले आहे की, दोन तासांच्या आत हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणे ही चांगली कल्पना नव्हती. सॉफ्टवेअर कंपनी सेल्सफोर्सने जानेवारीमध्ये 10 टक्के कर्मचारी काढून टाकले, ज्यामुळे 7,000 कर्मचारी प्रभावित झाले. न्यूयॉर्क टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत बेनिऑफ म्हणाले की, ही चांगली कल्पना नाही.
सेल्सफोर्सने 7,000 कर्मचाऱ्यांना काढून टाकले : ते म्हणाले, 'आम्ही परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न करत आहोत. एवढ्या मोठ्या ग्रुप मध्ये काढुन टाकलेले कर्मचारी महत्वाचे होते की नाही, हे ठरवणे कठीण आहे आणि आम्ही त्यांना योग्य ती किंमत दिलेली आहे. सेल्सफोर्सच्या कर्मचाऱ्यांनी बैठकीदरम्यान बेनिऑफवर टीका केली. या महिन्याच्या सुरुवातीला, अनेक सेल्सफोर्स कर्मचार्यांना कळले की, त्यांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे. कारण कंपनीने 7,000 कर्मचार्यांना किंवा तिच्या कर्मचार्यांपैकी 10 टक्के कर्मचारी कमी करण्यास सुरुवात केली.
दोन दिवसात 4,000 लोकांना कामावरून काढले : दोन दिवसात सेल्सफोर्सच्या स्लॅक चॅनलमधून जवळपास 4,000 कर्मचारी कमी केले. तर सॅन फ्रान्सिस्कोमध्ये, 'सेल्स आणि ग्राहक सेवा', 'तंत्रज्ञान आणि उत्पादन' आणि 'सामान्य प्रशासन' मध्ये कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांना एक धमकीवजा सुचना देऊन; 258 कर्मचार्यांना काढून टाकण्यात आले आहे. आयर्लंडमध्ये कंपनीच्या 2,100 कर्मचाऱ्यांपैकी 200 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आले. यूएस मध्ये, कमी केलेल्या कर्मचार्यांना त्यांच्या जगण्यास मदत करण्यासाठी किमान अंदाजे पाच महिन्यांचे वेतन, आरोग्य विमा, करिअर संसाधने आणि इतर फायदे देऊ केले. बेनिऑफ म्हणाले होते, 'यूएस बाहेरील लोकांना समान पातळीचा पाठिंबा मिळेल आणि आमच्या स्थानिक प्रक्रिया प्रत्येक देशातील रोजगार कायद्यांशी जुळतील.'