लखनऊ (उत्तरप्रदेश) -राज्यात कोरोनाच्या रुग्ण्ससंख्येत सातत्याने वाढ होत आहे. सोमवारी सकाळी आलेल्या अहवालानुसार राज्यात 6,850 नविन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. राज्यातील रुग्णसंख्या पाहता राज्यात जवळपास 72 हजार कंटेनमेंट झोन तयार करण्यात आले आहेत.
राज्यातील सक्रिय रुग्ण -
राज्यात दिवसेंदिवस बाधितांमध्ये वाढ होत आहे. सध्या राज्यात 2 लाख 35 हजार 752 सक्रिय रुग्ण आहेत. रविवारी राज्यात 30 हजार 983 रुग्णांची नोंद करण्यात आली होती. तर 290 जणांचा मृत्यू झाला होता. तर दिलासादायक बाब म्हणजे, 36 हजार 650 जणांनी कोरोनावर मात केली. या सर्व परिस्थितीत कोरोना नियमावलीचे पालन करावे, असे आवाहन शासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
तर याबरोबरच राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा कायम आहे.