महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

बंगळुरुमध्ये ६० विद्यार्थ्यांना कोरोना, शाळेत गेल्याने झाली बाधा, महाराष्ट्रातील शाळा ४ ऑक्टोबरला होणार सुरु

कर्नाटकमध्ये शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. आता प्राथमिक शाळा सुरु करण्याची तयारी कर्नाटक सरकारने चालवली आहे. अशा वेळी ६० विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

कर्नाटक शाळेतील विद्यार्थी कोरोनाग्रस्त
कर्नाटक शाळेतील विद्यार्थी कोरोनाग्रस्त

By

Published : Sep 29, 2021, 3:20 PM IST

Updated : Sep 30, 2021, 6:25 AM IST

बंगळुरु- जिल्हा प्रशासनाने श्री चैतन्य गर्ल रेसिडेंशिअल हायस्कूलला सील केले आहे. कर्नाटक राज्यात सध्या शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. विद्यार्थी शाळेत हजर राहत असल्याने ६० विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे सांगण्यात येत आहे. कोरोना झालेल्या ६० विद्यार्थ्यांपैकी केवळ दोघांना गंभीर लक्षणे दिसून येत आहेत. दरम्यान, महाराष्ट्रातही ४ ऑक्टोबरपासून शाळा सुरु करण्यात येणार आहेत. या घटनेने महाराष्ट्रातही भीतीचे वातावरण तयार झाले आहे.

कर्नाटकमध्ये शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. आता प्राथमिक शाळा सुरु करण्याची तयारी कर्नाटक सरकारने चालवली आहे. अशा वेळी ६० विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

यासंदर्भात बंगळुरु अरबन डिस्ट्रिक कमिशनर जे. मंजुनाथ म्हणाले, की २६ सप्टेंबर रोजी विद्यार्थी कोरोनाग्रस्त झाले होते. ४८० विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. बेल्लारी येथील एका विद्यार्थ्यामध्ये कोरोनाची लक्षणे दिसून आल्याने या चाचण्या करण्यात आल्या होत्या.

कोरोनाग्रस्त मुली ११ वी आणि १२ वी कक्षेतील आहेत. यातील १४ मुली कोरोनाचा प्रकोप जाणवत असलेल्या तमिळनाडू या राज्यातून आले आहेत. कर्नाटकातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील मुलांचा यात समावेश आहे. या शाळेत २२ शिक्षक आणि ५७ कार्यालयीन कर्मचारी कार्यरत आहे.

राज्यातील शाळा 4 ऑक्टोबरपासून होणार सुरू, मात्र.. शिक्षणमंत्र्यांनी सांगितली नियमावली

सध्या राज्यातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा सुरू करण्याचा शालेय शिक्षण विभागाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. कोरोनाच्या नियमांचं पालन करून शाळा ४ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात येणार आहेत. राज्यात ग्रामीण भागात ५ वी ते १२ वी चे वर्ग ४ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. शहरी भागात ८ वी ते १२ वीचे वर्ग सुरू होतील. यासाठी टास्क फोर्स आणि राज्य सरकारने मिळून बनवलेली नियमावली सर्व शाळा, पालक आणि विद्यार्थ्यांना लागू असेल, अशी माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ग्रामीण भागातील 5 वी पासून तर शहरी भागात 8 वी पासून शाळा सुरू होणार -

वर्षा गायकवाड यांनी सांगितले, की येणाऱ्या काळात 4 ऑक्टोबरला ग्रामीण भागातील 5 वी ते 12 वी आणि शहरी भागातील 8 वी ते 12 वी पर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कोरोनाच्या दोन लसी घ्याव्यात. हे SOP मध्ये आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची, सुरक्षेची काळजी घेऊन शाळा सुरू करण्यात येईल. विद्यार्थ्यांना घरात आल्यावर कपडे बदलणे, मास्क, याबाबत सूचना दिल्या जातील. पालकांसाठीही सूचना दिल्या जाणार आहेत. मुलांचे टेम्प्रेचर नेहमी तपासले जाईल.पालकांची सहमती आवश्यक -ज्या शाळा कोविड सेंटर म्हणून वापरल्या त्याठिकाणी जिल्हाधिकारी यांनी लक्ष द्यावे. विद्यार्थ्यांना उलट्या, जुलाब, ताप, पोटदुखी असेल तर पालकांना, शिक्षक यांना काळजी घेण्याच्या सूचना देण्यात येतील. शाळाबाह्य झालेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेत आणण्यासाठी मोहीम चालवणार..शाळेत उपस्थितीबाबत पालकांची सहमती महत्वाची असेल. कोरोना काळात किती विद्यार्थी शाळाबाह्य झाली याची तपासणी सुरू आहे.

विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घ्या -

शिक्षकांना टास्क फार्स ने दिलेल्या सुचनांबाबत ट्रेनिंग दिले जाईल. टास्कफोर्सने दिलेल्या सुचनेचे पालन केले जाईल. विद्यार्थ्यांनी कशी काळजी घ्यावी, याबाबत SOP तयार करण्यात आल्या आहेत. येणाऱ्या काळात 4 ऑक्टोबरला ग्रामीण भागातील 5 वी ते 12 वी आणि शहरी भागातील 8 वी 12 वी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी दोन लस घ्यावे, हे एसओपीमध्ये आहे.

Last Updated : Sep 30, 2021, 6:25 AM IST

For All Latest Updates

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details