हापूर- उत्तर प्रदेशातील हापूर जिल्ह्यातील एका रासायनिक कारखान्याला भीषण आग ( major fir broken out in a chemical factory ) लागली आहे. येथे बॉयलरचा स्फोट झाल्याने आग लागल्याची माहिती समोर येत ( fire started due to boiler explosion ) आहेत. या घटनेत 6 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.
आगीत कारखान्यातील अनेक कामगार अडकल्याची माहिती आहे. अग्निशमन दलाची सहा वाहने घटनास्थळी हजर आहेत. या घटनेत 8 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. सहाहून अधिक कर्मचारी जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना धौलाना पोलीस स्टेशन हद्दीतील यूपीएसआयडीसीची ( UPSIDC of Dhaulana police station ) आहे.
जिल्ह्यातील रासायनिक कारखान्यात बॉयलरचा स्फोट होऊन भीषण अपघात झाला. कारखान्याला लागलेल्या आगीमुळे आत काम करणाऱ्या 8 कामगारांचा वेदनादायक मृत्यू झाला. त्याचवेळी 15 कर्मचारी जखमी झाले. सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटना धौलाना पोलीस स्टेशन हद्दीतील यूपीएसआयडीसीची आहे. मुख्यमंत्री योगी यांनी या अपघातावर तीव्र दुःख व्यक्त केले आहे. यासोबतच अधिकाऱ्यांना घटनास्थळी पोहोचून जखमींवर योग्य उपचार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
जखमी कर्मचारी रुग्णालयात दाखल -अग्निशमन विभागाच्या अर्धा डझन गाड्यांनी आग आटोक्यात आणली आहे. धौलाना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील यूपीएसआयडीसी औद्योगिक क्षेत्रातील केमिकल कारखान्यात अचानक आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. आगीने भीषण रूप धारण केले. कारखान्यात एकच गोंधळ उडाला. आजूबाजूच्या लोकांनी अग्निशमन दल आणि पोलिसांना याची माहिती दिली. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अर्धा डझन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. मात्र, तोपर्यंत या आगीत 8 कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. 15 हून अधिक कामगार जखमी झाले. जखमी कर्मचाऱ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यातील काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.