नवी दिल्ली: शाहदरा जिल्ह्यातील सायबर पोलिसांच्या पथकाने अभिषेक बच्चन, सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी, ऐश्वर्या राय, हिमेश रेशमिया, सुष्मिता सेन यांच्यासह 95 हून अधिक सेलिब्रिटींच्या नावाने फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या टोळीतील ५ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
मोबाईल आणि लॅपटॉपसह अनेक वस्तू जप्त: आरोपींकडून 10 मोबाईल, 1 लॅपटॉप, 3 CPU, 34 बनावट पॅन कार्ड, 25 बनावट आधार कार्ड, 40 डेबिट/क्रेडिट कार्ड आणि इतर अनेक कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. ईस्टर्न रेंजच्या जॉइंट सीपी छाया शर्मा यांनी सांगितले की, अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे 42 वर्षीय सुनील कुमार, 25 वर्षीय पुनीत, 32 वर्षीय आसिफ, 42 वर्षीय विश्व भास्कर शर्मा 37 वर्षीय अशी आहेत.
सेलिब्रिटींच्या नावाने बनवली जात होती क्रेडिट कार्ड : छाया शर्मा यांनी सांगितले की, या टोळीतील सदस्य सेलिब्रिटींच्या वैयक्तिक माहितीवरून बनावट पॅनकार्ड आणि आधार कार्ड बनवायचे आणि वन कार्ड बँकेतून सेलिब्रिटींच्या नावाने क्रेडिट कार्ड मिळवायचे. त्या क्रेडीट कार्डने शॉपिंग करायचे आणि कॅश ट्रान्सफरही करायचे. वन कार्ड बँकेच्या तक्रारीवरून तपास सुरू झाला असून, आतापर्यंत ५ आरोपींना अटक करण्यात आली आहे. चौकशीत या आरोपींनी आतापर्यंत ९० लाखांहून अधिकची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.