नवी दिल्ली :राजधानी दिल्लीत ( Delhi Crime ) आणखी एक खळबळजनक खुनाची घटना समोर आली आहे. दक्षिण पश्चिम दिल्लीतील पालम पोलीस स्टेशन परिसरात एकाच कुटुंबातील ४ जणांची हत्या करण्यात ( 4 People Of Same Family Killed ) आली आहे. घरात उपस्थित असलेले आई, वडील, बहीण आणि आजीची हत्या झाल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. पालम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राज नगर पार्ट २ कॉलनीत ही हत्या झाली आहे. ( 4 People Of Same Family Killed In Palam Delhi )
चाकूने वार करून केली हत्या :प्राथमिक माहितीनुसार, एका मुलाने आई-वडील, बहीण आणि आजीची हत्या केली आहे. मंगळवारी रात्री 10.31 वाजता पोलिसांना ही माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, चौघांचीही चाकूने वार करून हत्या करण्यात आली आहे. आरोपी मुलगा अंमली पदार्थांच्या व्यसनाने त्रस्त असून नुकताच तो व्यसनमुक्ती केंद्रातून बाहेर पडला असल्याचेही सांगण्यात आले.