नवी दिल्ली - सरन्यायाधीश एन. व्ही. रामणा यांच्या अध्यक्षतेखालील सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलिजियमने तीन महिला न्यायाधीशांची सर्वोच्च न्यायालयात बढती करण्याची शिफारस केली आहे. यामध्ये न्यायाधीश बी. व्ही. नागरत्ना (कर्नाटक दिल्ली उच्च न्यायालय), न्यायाधीश हिमा कोहली (तेलंगाणा उच्च न्यायालय) आणि न्यायाधीश बेला त्रिवेदी (गुजरात उच्च न्यायालय) यांचा समावेश आहे. या तिन्ही महिला न्यायाधीशांपैकी एका महिला न्यायाधीशांची सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी नियुक्ती होण्याची शक्यता आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आर. एफ. नरिमन हे 12 ऑगस्टला निवृत्त झाले. त्यांच्या निवृत्तीनंतर सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या 25 वर आली आहे. प्रत्यक्षात सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीशांसह न्यायाधीशांची 34 पदे मंजूर आहेत. तत्कालीन सरन्यायाधीश रंजन गोगाई हे 19 मार्च 2019 रोजी निवृत्त झाल्यानंतर बढती होऊन सर्वोच्च न्यायालयात नवीन न्यायाधीशांची नियुक्ती झालेली नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात नवीन न्यायाधीशांच्या नियुक्त्या करण्यात येणार आहेत.
हेही वाचा-खळबळजनक.. पुण्यात पोलीस आयुक्तालयाच्या दारातच एकाचा आत्मदहनाचा प्रयत्न, ससूनमध्ये उपचार सुरू
महिला न्यायाधीश बी. व्ही. नागरत्न पुढील सरन्यायाधीश होण्याची शक्यता-
सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियममध्ये न्यायाधीश यु. यु. ललित, ए. एम. खानविलकर, डी. वाय. चंद्रचुड आणि एल. नागेश्वर राव यांचा समावेश आहे. या कॉलिजियमने तीन महिला न्यायाधीशांची शिफारस केल्याचे सूत्राने साांगितले. कर्नाटक उच्च न्यायालयाच्या महिला न्यायाधीश बी. व्ही. नागरत्न या पुढील सरन्यायाधीश होऊ शकतात, असे सूत्राने सांगितले.