महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Unique Wedding : साडेतीन फुटाच्या वराला मिळाली 4 फुटाची वधू; Watch Video - साडेतीन फुटाचा वर

बिहारमधील सारणमध्ये एक अनोखा विवाह सोहळा पाहायला मिळाला. येथे साडेतीन फुटाच्या वराला 4 फुटांची वधू मिळाली आहे. कमी उंचीमुळे या तरुणाचे लग्न होत नव्हते. वाचा संपूर्ण बातमी... (3 FEET GROOM 4 FEET BRIDE).

Bihar Unique Wedding
साडेतीन फुटाच्या वराने चार फुटाच्या वधूसोबत लग्न

By

Published : Jul 30, 2023, 7:47 PM IST

पहा व्हिडिओ

सारण (बिहार) : जोड्या स्वर्गातूनच बनून येतात असे अनेकदा म्हटले जाते. यालाच अनुरूप असे एक प्रकरण बिहारमधून समोर आले आहे. बिहारमधील छपरा येथे एक अनोखा विवाह सोहळा पार पडला आहे. येथे एका साडेतीन फुटाच्या वराने चार फुटाच्या वधूसोबत लग्न केले आहे! (3 FEET GROOM 4 FEET BRIDE).

कमी उंचीमुळे लग्न जुळत नव्हते : बिहारच्या लेरुआ येथील रहिवासी रोहित सिंह याची उंची केवळ साडेतीन फूट म्हणजेच ४२ इंच आहे. कमी उंचीमुळे त्याचे लग्न जुळत नव्हते. पण आता उशिरा का होईना रोहितचे लग्न झाले आहे. साडेतीन फुटाच्या रोहितला चार फुटाची वधू मिळाली आहे. खबसी येथील रहिवासी असलेल्या नेहासोबत रोहितचे लग्न झाले आहे. नेहाची उंची 4 फूट आहे.

रोहित कंपाउंडर म्हणून काम करतो : या लग्नामुळे वधू - वराचे कुटुंबीय खूप आनंदी आहे. वराचा मोठा भाऊ अमर कुमारने सांगितले की, रोहितला कमी उंचीमुळे अनेक प्रकारचा उपहास आणि छळाचा सामना करावा लागला आहे. रोहितने जवाहरलाल नेहरू कॉलेज, मढौरा येथून बारावी पर्यंत शिक्षण पूर्ण केले आहे. तो सध्या कंपाउंडर म्हणून काम करतो आहे.

माझ्या भावाला त्याच्या कमी उंचीमुळे मुलगी मिळत नव्हती. आता त्याला त्याच्या जोडीची मुलगी सापडली आहे. या दोघांनी लग्न केले आहे. माझ्या भावाचे लग्न झाले याचा आम्हाला खूप आनंद आहे. - अमन कुमार, वराचा भाऊ

मंदिरात विवाह सोहळा पार पडला : वधू नेहाचा भाऊ शैलेश याने सांगितले की, त्यांना राहुलबद्दल माहिती मिळाली होती. त्यानंतर दोन्ही पक्षांच्या लोकांनी लग्नाची तारीख निश्चित केली आणि दोघांचाही जिल्ह्यातील गाढादेवी मंदिरात विवाह झाला. नेहाने पाचवीपर्यंत शिक्षण घेतले आहे. मात्र ती अतिशय हुशार आणि चणाक्ष आहे. या दोघांच्या लग्नाला वधू आणि वराकडचे बरेच नातेवाईक उपस्थित होते.

हे ही वाचा :

  1. Mortgage for Tomato : टोमॅटोसाठी कायपण; चक्क दोन अल्पवयीन मुलांना दुकानदाराकडे ठेवले गहाण
  2. Crime News : 'माझी बायको दहशतवादी आहे', पत्नीपासून सुटका मिळवण्यासाठी पतीची अजब युक्ती!
  3. Crime News : धक्कादायक! नवऱ्याने कर्ज फेडण्यासाठी केला चक्क बायकोचाच सौदा

ABOUT THE AUTHOR

...view details