काठमांडू -या विमानातील 22 प्रवाशांचे मृतदेह सापडले आहेत. विमानाचा ब्लॅक बॉक्सही आढळला आहे. ( Tara Air plane crash ) तो बेस स्टेशनला आणण्यात येणार आहे अशी माहिती रेस्क्यू अधिकाऱ्यांनी दिली.
15 नेपाळी सैनिकांची एक टीम जिथे विमान क्रॅश झाले तिथे उतरली होती. हे सैनिक बळींचे मृतदेह मिळवण्याचे प्रयत्न केले. जिथे विमान कोसळले ती जागा 14,500 फुटांवर आहे. ( Missing tara air Accident ) तर, या टीमला 11,000 फुट उंचीवर उतरवले आहे अशी माहिती नेपाळ सैन्याच्या प्रवक्त्यांनी ट्वीट करून दिली होती.
हे एक 9 NAET ट्विन इंजिन प्रकारचे छोटे प्रवासी विमान होते. या विमानाने पोखरा येथून जॉमसमला जाण्यासाठी सकाळी 9.55 वाजता उड्डाण भरले. पण, 10.11 मिनिटांनी विमानाचा संपर्क तुटल्याची माहिती समोर आली. विमानाशी संपर्क तुटला, तेव्हा ते धौलागिरी परिसरात होते, तसेच त्याचा शोध घेण्यासाठी हेलिकॉप्टर पाठवण्यात आले अशी माहितीही मिळाली आहे.
खराब हवामानामुळे आधी शोधमोहिमेवर गेलेले नेपाळी लष्कराचे हेलिकॉप्टर मागे फिरले. दुपारी पुन्हा शोध घेण्यात आला. तेव्हा नेपाळमधील मुस्तांगच्या कोवांग परिसरात जमिनीवर हे विमान आढळून आल्याची माहिती काठमांडूतील त्रिभुवन इंटरनॅशनल एयरपोर्टच्या प्रमुखांनी दिल्याचे एएनआय वृत्तसंस्थेने म्हटले आहे.
नेपाळी लष्कराला स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, लामचे नदीच्या मुखाजवळ हे विमान कोसळले आहे. लष्कराची टीम घटनास्थळाकडे निघाल्याची माहिती नेपाळी लष्कराचे प्रवक्ता नारायण सिलवाल यांनी दिली आहे. नेपाळमधल्या भारतीय दूतावासाचे अधिकारी या विमानातून प्रवास करणाऱ्या भारतीयांच्या कुटुंबीयांच्या संपर्कात असल्याचेही दूतावासाने ट्विटरवर म्हटले आहे.
फ्लाईटरडार या वेबसाईटच्या माहितीनुसार या विमानाने पहिले उड्डाण एप्रिल 1979 मध्ये भरले होते. दरम्यान, नेमके या विमानाच्या बाबतीत काय झाले असावे, याविषयी ठोस माहिती अजून उपलब्ध नाही. पण स्थानिक वृत्तानुसार पोखरा-जॉमसम परिसरात सकाळपासून ढगाळ वातावरण होते.
हिमालयातला देश असलेल्या नेपाळमध्ये हवाई वाहतूक नेहमीच आव्हानात्मक असते. इथला लुकला विमानतळ जगातल्या सर्वांत धोकादायक विमानतळापैंकी एक मानला जातो. याआधीही नेपाळच्या पर्वतराजींत मोठे अपघात झाले होते. 2018 साली यूएस-बांग्ला एयरलाईनच्या विमानाने काठमांडूमध्ये उतरताच पेट घेतला होता आणि त्या अपघातात 51 जणांचा मृत्यू झाला होता. तसेच, 1992 साली पाकिस्तान इंटरनॅशनल एयरलाईन्सच्या विमानाची एका पर्वतशिखराशी टक्कर झाली होती आणि विमानातील सर्व 167 जणांचा मृत्यू झाला होता.
हेही वाचा -राज ठाकरे होणार आज लिलावती रुग्णालयात दाखल, 1 जूनला हिप बोनचं ऑपरेशन