महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

भाजप, आरएसएसकडून होणारा खोटा प्रचार रोखण्यासाठी आपल्याला एकजुटीने लढणे गरजेचे -सोनिया गांधी - etv bharat live

लोकशाही, राज्यघटना आणि यासोबत काँग्रेस पक्षाच्या विचारसरणीचे आपल्याला रक्षण करायचे आहे. तसेच, सध्या भाजपकडून होणारा खोटा प्रचार ओळखण्यासाठी आणि त्याचा प्रतिकार करण्यासाठी आपण एकत्र प्रयत्न करणे गरजेचे आहे. असे मत काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी व्यक्त केले आहे. आज काँग्रेसच्या मुख्यालयात सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाच्या प्रमुख नेत्यांसोबत बैठक झाली. त्यामध्ये त्या बोलत होत्या.

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी

By

Published : Oct 26, 2021, 9:50 AM IST

Updated : Oct 26, 2021, 12:18 PM IST

नवी दिल्ली - आपल्याला लोकशाही, राज्यघटना आणि यासोबत काँग्रेस पक्षाच्या विचारसरणीचे रक्षण करायचे आहे. तसेच, सध्या भाजपकडून होणारा खोटा प्रचार ओळखण्यासाठी आणि त्याचा प्रतिकार करण्यासाठी आपण प्रयत्न करणे गरजेचे आहे. असे मत काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी व्यक्त केले आहे. आज काँग्रेसच्या मुख्यालयात पंजाब, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर आणि गोव्याच्या आगामी विधानसभा निवडणुकांसह इतर मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाच्या प्रमुख नेत्यांसोबत बैठक झाली. त्यामध्ये त्या बोलत होत्या.

भाजप, आरएसएसच्या वैचारिक मोहिमेशी वैचारिक मुकाबला

आपण भाजप, आरएसएसच्या वैचारिक मोहिमेशी वैचारिक मुकाबला केला पाहिजे. आपल्याला ही लढाई जिंकायची असेल तर यासाठी आपण दृढ निश्चयाने लोकांसमोर केले पाहिजे. भाजप, आरएसएसकडून होणारा खोटा प्रचार आपण उघड केला पाहिजे. असही सोनिया गांधी यावेळी म्हणाल्या आहेत.

सर्वांनी वैयक्तिक महत्त्वाकांक्षा बाजूला सारून काम केले पाहिजे

दरम्यान, मी शिस्त आणि एकतेला सर्वोच्च प्राधान्य देऊ इच्छीते. काँग्रेसमधील आपल्यापैकी प्रत्येकासाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे संघटना मजबूत करणे. सर्वांनी वैयक्तिक महत्त्वाकांक्षा बाजूला सारून काम केले पाहिजे अशी अपेक्षाही सोनिया गांधींनी यावेळी व्यक्त केली आहे.

पक्षाची संघटनात्मक निवडणूक 6 सप्टेंबर 2022 रोजी होऊ शकते

यापूर्वी, काँग्रेस कार्यकारिणीची (16 ऑक्टोबर)रोजी बैठक झाली होती. त्यामध्ये पुढील वर्षी संघटनात्मक निवडणुका घेतल्या जातील. तसेच, 1 नोव्हेंबरपासून सदस्यता मोहीम सुरू होईल असेही जाहीर करण्यात आले आहे. दरम्यान, पक्षाची संघटनात्मक निवडणूक 6 सप्टेंबर 2022 रोजी होऊ शकते आणि ऑक्टोबरपर्यंत पक्षाचा नवा अध्यक्ष ठरेल अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.

राहूल गांधी यांनी पक्षाचे अध्यपद स्वीकारण्याबाबत आश्वासन दिले

भारतीय युवक काँग्रेस, एनएसयूआय, महिला काँग्रेस आणि पक्षाच्या सोशल मीडिया विभागासारख्या आघाडीच्या संघटनांनी राहुल गांधींना पक्षाध्यक्ष बनवण्याचा ठराव मंजूर केला आहे. दरम्यान, राजस्थान, पंजाब आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, चरणजित सिंग चन्नी आणि भूपेश बघेल यांनीही राहुल गांधींना पक्षाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारण्याची विनंती केली होती. यावर काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी राहूल गांधी यांनी पक्षाचे अध्यपद स्वीकारण्याबाबत आश्वासन दिले आहे अशी माहिती दिली आहे.

हेही वाचा -भाजपाने अन् त्याचे राजकीय हुकूम ऐकणाऱ्या यंत्रणांनी लक्षात ठेवा, सरकार केंव्हाही बदलू शकते - सामना

Last Updated : Oct 26, 2021, 12:18 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details