तिरुवनंतपुरम (केरळ) - कोरोनाच्या संकटातून जाणाऱ्या केरळला आणखी नवीन संकटाला सामोरे जावे लागणार आहे. झिका हा विषाणुजन्य रोग केरळमध्ये आढळला आहे. केरळमध्ये झिका विषाणूचे आणखी दोन रुग्ण आढळले आहेत. जुलै महिन्याच्या सुरवातीला केरळमध्ये झिका विषाणूचे पहिला रुग्ण आढळला होता. डासांपासून पसरणाऱ्या या विषाणूसंदर्भात सर्व जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मंगळवारी खासगी रुग्णालयात काम करणाऱ्या एका डॉक्टरला आणि एका 16 वर्षांच्या मुलीला झिका विषाणूची लागण झाली आहे. एकूण 23 रुग्णांना झिका विषाणूची लागण झाली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी माहिती दिली.