डेहराडून -उत्तराखंडच्या पिथोरागढमध्ये भूस्खलन झाले असून दोन लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 5 जण ढिगाऱ्याखाली दबल्याची माहिती आहे. ही घटना पिथोरागढच्या जुम्मा गावात घडली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना रेस्क्यू ऑपरेशन वेगाने करण्याचे निर्देश दिल्याची माहिती मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी टि्वट करून दिली. तिथे फसलेल्या लोकांची सुटका व्हावी, यासाठी पार्थना केल्याचेही त्यांनी सांगितले.
दोन दिवसांपूर्वीदेखील येथे ढगफुटी झाली होती. त्यामुळे पूर आला होता. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. यापूर्वीही आशा अनेक घटना घडल्या आहेत. उत्तराखंडवर अनेकदा नैसर्गिक संकट ओढावले आहेत.
हिमकडा कोसळल्यानं मोठं नैसर्गिक संकट -