नवी दिल्ली : 15 वी ब्रिक्स परिषद या वर्षी ऑगस्टच्या अखेरीस दक्षिण आफ्रिकेतील डरबन येथे होणार आहे. 14 वी ब्रिक्स शिखर परिषद चीनमध्ये आयोजित करण्यात आली होती. ब्राझील, रशिया, भारत आणि चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी 2006 मध्ये प्रथम संयुक्त राष्ट्रांच्या महासभेदरम्यान ब्रिक्सवर चर्चा केली होती. नंतर एप्रिल 2011 मध्ये, दक्षिण आफ्रिकेने चीनमधील सान्या येथे झालेल्या तिसर्या ब्रिक्स परिषदेत प्रथमच भाग घेतला. रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव यांनी 26 जानेवारी रोजी इरिट्रियाच्या मसावा येथे परराष्ट्र मंत्री उस्मान सालेह यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषदेत ही घोषणा केली होती.
इतर देशांसोबत संबंध विकसित करण्याचे उद्दीष्ट : लावरोव्ह म्हणाले की, 'ब्रिक्स हे जागतिक बहु-ध्रुवीयतेचे प्रकटीकरण आहे. जगाच्या विकसनशील प्रदेशांमध्ये प्रादेशिक ओळख मजबूत करणे हे ब्रिक्सचे उद्दीष्ट आहे'. ब्रिक्स संघटना पाच देशांना एकत्र करते. तसेच 12 पेक्षा जास्त देशांनी या संघटनेत सामील होण्यास स्वारस्य दाखवले आहे. दक्षिण आफ्रिकेतील डरबन येथे ऑगस्टमध्ये होणाऱ्या आगामी शिखर परिषदेत ब्रिक्स आणि इतर देशांमधील संबंध विकसित करणे हा मुख्य विषय असेल.