दमोह (मध्य प्रदेश) - एका अल्पवयीन बलात्कार पीडितेने (Rape Victim Kills Child) मुलाला जन्म दिल्यावर ४० दिवसांनी त्या अर्भकाचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी अल्पवयीन मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला बालसुधारगृहात पाठवले आहे.
हे प्रकरण तेंदुखेडा परिसरात आहे. एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचे (15 years old damoh rape victim)चे त्याच्याच गावातील १७ वर्षीय मुलासोबत प्रेमसंबंध होते. आरोपीने तरुणीवर अत्याचार केले. यामुळे ती आई झाली, मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार केल्यावर आरोपीला अटक करण्यात आली. आणि तिची रवानगी बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली. दरम्यान, मुलीने यापूर्वी मुलाला जन्म दिला होता, नंतर तिचा मृत्यू झाला.