आज 'या' बातम्यांवर असेल नजर -
- आज मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक
दुपारी साडे तीन वाजता राज्यमंत्रिमंडळाची बैठकही सह्यादी अतिथीगृहात होणार आहे. - नवाव मलिक यांची पत्रकार परिषद
विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मलिक यांच्यावर आरोप केले होते त्यावर पत्रकार परिषद घेऊन नवाब मलिक म्हणाले होते की, दिवाळीनंतर आपण बॉम्ब फोडू, असे म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी कोणताही धमाका केला नाही. मात्र, मी उद्या पत्रकार परिषद घेऊन हायड्रोजन बॉम्ब फोडेल, असा इशारा दिला आहे. सविस्तर वाचा... - सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वात आज मंत्रालयासमोर एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन
- आज जागतिक विज्ञान दिन
कालच्या महत्त्वाच्या बातम्या -
- मुंबई - शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी सपत्नीक शरद पवारांची भेट घेतली. यानंतर त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनावर जाऊन भेट घेतली आहे. यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. सविस्तर वाचा...
- मुंबई -देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत नवाव मलिक यांचे संबंध अंडरवर्ल्डशी असल्याचा आरोप केला होता. त्यावर मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांना प्रत्युत्तर दिले होते. त्यावर आता अमृता फडणवीस यांनीही ट्वीटर वरून मलिकांवर हल्लाबोल केला आहे. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की... सविस्तर वाचा...
- मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मान आणि मणक्याचा त्रास सुरू झाला होता. मुख्यमंत्र्यांच्या पाठीचा मणका आणि मानेच्या स्नायूच्या दुखापतीचा त्रास बळावल्याची माहिती समोर आली. त्यांना मागील आठवड्यापासून हा त्रास जाणवू लागला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांवर येत्या दोन ते तीन दिवसांत महत्वाची शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती मिळते. गिरगावमधील एच. एन. रिलायन्स रुग्णालयात ही शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. डॉ. शेखर भोजराज हे मुख्यमंत्र्यांवर शस्त्रक्रिया करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. सविस्तर वाचा...
- मुंबई -एसटी महामंडळाचा विलीनीकरणाच्या मागणीवरुन सुरू असलेला संपाचा आज 12 वा दिवस आहे. राज्यातील 250 आगारांपैकी 247 आगार बंद राहिले होते. परिणामी संपात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांनवर एसटी महामंडळाकडून कठोर कारवाई सुरू झाली आहे. आज दिवसभरात 376 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. सविस्तर वाचा...
- सातारा - 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गेल्या सात वर्षांत देशातील गोरगरीब जनतेकडून इंधन दरवाढीच्या नावाखाली 23 लाख कोटींची वसुली केली ही एक प्रकारे जनतेची लूट असल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. सविस्तर वाचा...
जाणून घ्या आजचे राशीभविष्य-