नवी दिल्ली - देशात गेल्या 24 तासांमध्ये 1 लाख 34 हजार 154 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर 2 हजार 887 जणांचा मृत्यू झाला. ही माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली. बहुतेक मेट्रो शहरे अजूनही दुसर्या लाटेचा सामना करत आहेत.
एकूण रुग्णांची संख्या 2 कोटी 84 लाख 41 हजार 986 आहे. तर 17 लाख 13 हजार 413 सक्रिय रुग्ण आहेत आणि आतापर्यंत 3 लाख 37 हजार 989 मृत्यू झाले आहेत. तर गेल्या 24 तासांमध्ये 2 लाख 11 हजार 499 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यंत 2 कोटी 63 लाख 90 हजार 584 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
देशात गेल्या 16 जानेवरीपासून लसीकरण सुरू आहे. गेल्या 24 तासांत 24 लाख 26 हजार 265 जणांना लस टोचवण्यात आली असून आतापर्यंत 22 कोटी 10 लाख 43 हजार 693 जणांचे लसीकरण झाले आहे. तर कोरोना चाचण्याचे प्रमाण वाढले असून काल दिवसभरात 21 लाख 59 हजार 873 चाचण्या घेण्यात आल्या आहेत. तर आतापर्यंत 35 कोटी 37 लाख 82 हजार 648 चाचण्या झाल्या आहेत.