Sanjay Raut : मातोश्रीशी छेडछाड करू नका, २० फूट खाली गाडले जाल : संजय राऊतांचा राणा दाम्पत्याला इशारा

By

Published : Apr 23, 2022, 5:19 PM IST

thumbnail

नागपूर : खासदार नवनीत राणा ( MP Navneet Rana ) आणि आमदार रवी राणा ( MLA Ravi Rana ) यांनी मातोश्री येथे जाऊन हनुमान चालीसा पठण ( Hanuman Chalisa At Matoshree ) करण्याचा संकल्प केला होता. मात्र मुंबईत झालेल्या नाट्यमय घडामोडीनंतर त्यांनी आपला संकल्प स्थगित केल्याचं जाहीर केलं आहे. राणा दाम्पत्याने आपला संकल्प मागे घेतल्याचे जाहीर करतात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला ( Sanjay Raut Criticized Navneet Ravi Rana ) आहे. जातीचे बोगस प्रमाणपत्र ( Navneet Rana Caste Certificate Issue ) मिळवून खासदार झालेल्या तथाकथित लोकांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. अशा भाषेत त्यांनी राणा दाम्पत्याला खडेबोल सुनावले आहेत. यापुढे असे धाडस केल्यास शिवसैनिक त्यांना अद्दल घडल्याशिवाय राहणार नसल्याचे देखील ते म्हणाले ( Sanjay Raut Warns Navneet Ravi Rana ) आहेत.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.