VIDEO: Saint Premier League; हरिद्वारात संत प्रिमीयर लीग; साधुंनी क्रिकेट लुटला क्रिकेट खेळण्याचा आनंद

By

Published : Apr 7, 2022, 7:16 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST

thumbnail

लखनौ- जसजसा आयपीएलचा हंगाम ( Cricket in Sri Panchayati Niranjani Akhara ) येत आहे, तसतशी लोकांमध्ये क्रिकेटची क्रेझ वाढत आहे. यामध्ये हरिद्वारच्या साधुंचा ( The saints of Haridwar playing cricket ) अपवाद नाही. श्री पंचायती निरंजनी आखाड्यात साधू क्रिकेट खेळताना ( IPL of the saints of Haridwar ) दिसले आहेत. हरिद्वारच्या या आश्रमात साधु हे जबरदस्त गोलंदाजी आणि दमदार फलंदाजी करताना दिसून आले. क्रिकेट टीम इंडिया आणि आयपीएल टीमचे देशभरात घरोघरी कौतुक करत आहेत. अशातच हरिद्वाराती साधूही क्रिकेट खेळून शारीरिक व्यायाम करत आहेत. साधुंनी सांगितले की, पूजाअर्चा करून आम्ही दुपारी वेळी मोकळ्या वेळेत क्रिकेट खेळतो. खेळ खेळल्याने आपले शरीर निरोगी राहते, असे संतांनी सांगितले. त्यामुळे पुजेत चांगल्या प्रकारे लक्ष केंद्रित करणे शक्य होते. मोकळ्या वेळेत क्रिकेट खेळल्याने जिथे शरीरात फिटनेस टिकून राहतो, तिथे वेळेचा सदुपयोगही होतो. खेळादरम्यान काही संत चांगले फटकेबाजी आणि गोलंदाजी करतानाही दिसले. खेळाच्या भावनेने क्रिकेट खेळावे, असे आवाहनही साधुंनी केले आहे. त्यावर जुगार लावू नका. क्रिकेट खेळल्याने शरीर तर निरोगी राहतेच, शिवाय एकमेकांमधील प्रेमही टिकून राहते, असे साधुंनी म्हटले आहे.

Last Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.