ETV Bharat / state

Shah Rukh Khan arrested : शाहरुख खानला चोरी करताना सिमरनने पकडले; पण...

शाहरुख खान चोऱ्याही फिल्मी स्टाईलने (Stealing in filmy style) करत असल्याचे समोर आले. मात्र त्याचा चोरीचा डाव सिमरन झडप घालून उधळून लावल्याचा प्रयत्न केला. मात्र चोरट्याने तिला जोरदार धक्का देत तिच्या तावडीतून सुटून पळ काढला (Stealing and running away). याप्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात शाहरुख खानवर गुन्हा दाखल करून त्याला पोलिसांनी बेडया ठोकल्या (Shah Rukh Khan arrested in theft case) आहे. Latest news from Thane, Thane Crime

author img

By

Published : Nov 15, 2022, 10:29 PM IST

Shah Rukh Khan arrested
शाहरुख खान

ठाणे : नाव अभिनेत्याचे असल्याने तो चोऱ्याही फिल्मी स्टाईलने (Stealing in filmy style) करत असल्याचे समोर आले. मात्र त्याचा चोरीचा डाव सिमरन झडप घालून उधळून लावल्याचा प्रयत्न केला. मात्र चोरट्याने तिला जोरदार धक्का देत तिच्या तावडीतून सुटून पळ काढला (Stealing and running away). याप्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात शाहरुख खानवर गुन्हा दाखल करून त्याला पोलिसांनी बेडया ठोकल्या (Shah Rukh Khan arrested in theft case) आहे. Latest news from Thane, Thane Crime

पाचव्या मजल्यावर घरात घुसून चोरीचा प्रयत्न - चोरटा शाहरूख फिरोज खान हा मफतलाल चाळ, साईबाबा मंदिराजवळ, कळवा भागात राहणारा आहे. त्याने कल्याण पश्चिम भागातील बैलबाजार, रामवाडी, येथील रामकुवर मेन्श मधील पाचव्या मजल्यावर राहणारे प्रेमनाथ यांच्या घरात दिवसाढवळ्या रविवारी दुपारच्या सुमारास चोरीचा डाव रचला. त्यावेळी प्रेमनाथ यांच्या पाचव्या माळ्यावरील घराचा दरवाजा उघडा होता. यावेळी घरातील काही मंडळी बाहेर गेली होती. घरात प्रेमनाथ यांची मुलगी सिमरन एकटीच होती. मात्र ती किचनमध्ये होती. तर तिचा मोबाईल घराच्या दर्शनी भागातील हॉलमध्ये होता. हीच संधी साधून घरात कुणीही नसल्याचे पाहून चोरटा शाहरूख खाने याने गुपचूप घरात प्रवेश केला.

शाहरूख विरुद्ध अनेक पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद - प्रेमनाथ यांच्या घरातील सभागृहात ठेवलेला महागडा मोबाईल घेऊन तो पळू लागला. मात्र सिमरनला याची चाहूल लागताच तिने शाहरुखचा फिल्मी स्टाईलने पाठलाग करत तिने या चोरट्याला पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याने सीमरनला जोरात धक्का देऊन खाली पाडले. या संधीचा गैरफायदा घेऊन तो पळून गेला होता. मात्र सिमरनने आरडाओरडा केल्याने त्याला काही नागरिकांनी महागड्या मोबाईलसह पकडले. त्यानंतर पोलिसांचे एक पथक घाटनास्थळी दाखल होऊन त्याला ताब्यात घेऊन अटक केली. शाहरुख खान हा सराईत चोरटा असून त्याच्यावर अनेक पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. या प्रकरणी सपोनि देविदास ढोले अधिक तपास करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.