ETV Bharat / state

बाप्पा निघाले गावाला...ठाण्यामध्ये महापालिकेकडून गणपती विसर्जनाची चोख तयारी

ठाणे महानगरपालिकेच्या वतीने अग्निशमन दल, रुग्णवाहिका आणि स्वयंसेवक ठेवण्यात आले आहेत. ठाण्यातील रेतीबंदर रोड येथील घाट कळवा पारसिक घाट, विटावा गणेश घाट, साकेत घाट, मासुंदा कृत्रिम तलाव अशा सर्व घाटांवर पोलीस आणि महापालिकेच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे.

बाप्पा निघाले गावाला
author img

By

Published : Sep 11, 2019, 8:55 PM IST

ठाणे - गणेश विसर्जन सोहळ्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. गणरायाचे विसर्जन करण्यासाठी महापालिकेच्या वतीने विसर्जन घाट, कृत्रिम घाटांची निर्मिती केली आहे. तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी ठाणे पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. सोबत सीसीटीव्हीची करडी नजर विसर्जन घाटावर राहणार आहे.

ठाण्यामध्ये महापालिकेकडून गणपती विसर्जनाची चोख तयारी

हेही वाचा - ठाण्यातील महापौर, आयुक्त वादात उद्धव ठाकरे यांची मध्यस्ती

गणेश विसर्जनासाठी साडेतीन हजार पोलीस बंदोबस्तासाठी असणार आहेत. एसआरपीएफ आणि वाहतूक विभागाकडून कडून देखील चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. विसर्जन घाटाच्या मार्गावर अवजड वाहने येण्यास बंदी केली आहे. त्यामुळे त्या वाहनांना इतरत्र वळवण्यात आले आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी विसर्जन घाटावर सीसीटीव्हीच्या माध्यमातून करडी नजर ठेवण्यात येणार आहे.

हेही वाचा - मोहर्रम सणानिमित्त भिवंडीत मुस्लिम बांधवांची भव्य मिरवणूक

ठाणे महानगरपालिकेच्या वतीने अग्निशमन दल, रुग्णवाहिका आणि स्वयंसेवक ठेवण्यात आले आहेत. ठाण्यातील रेतीबंदर रोड येथील घाट कळवा पारसिक घाट, विटावा गणेश घाट, साकेत घाट, मासुंदा कृत्रिम तलाव अशा सर्व घाटांवर पोलीस आणि महापालिकेच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे.

ठाण्यातील मुंब्रा येथील रेतीबंदर या भागात 15 ते 20 फूट उंचीच्या गणरायाच्या मुर्ती विसर्जनासाठी येत असतात. त्यासाठी एकूण 3 विसर्जन घाट तयार करण्यात आले आहेत. भक्तांची गर्दी पाहता यंदा तिसरा विसर्जन घाट या ठिकाणी तयार करण्यात आला आहे. तसेच मूर्तीसाठी विशेष ट्रॉल्या देखील ठेवण्यात आल्या असल्याची माहिती वाहतूक विभागाचे उपायुक्त अमित काळे यांनी दिली आहे.

Intro:गणेशाला निरोप देण्यासाठी ठाणे पोलिसांचा फौजफाटा तैनात
मुंब्रा रेतीबंदरमध्ये तीन विसर्जन घाट-विविध सुविधाची सेवा उपलब्धBody:

ढोलताशाच्या गजरात गणेशाचे आगमन झाले. त्याच जल्लोषात गुरुवारी गणेशाला भक्तगण निरोप देणार आहेत. ढोलताशाच्या गजरात नाचत येणाऱ्या गणेश भक्तांच्या गणरायाचे विसर्जन करण्यासाठी महापालिकांच्या वतीने विसर्जन घाट , कृत्रिम घाट निर्मिती केली आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ठाणे पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. सोबत सीसीटीव्हीची करडी नजर विसर्जन घाटावर राहणार आहे.

गणेश विसर्जनासाठी ठाणे पोलिसांनी साडेतीन हजार पोलिस बंदोबस्तासाठी असणार आहे एसआरपीएफ आणि वाहतूक विभागाकडून कडून देखील पोलिस बंदोबस्त असणार आहे. विसर्जन घाटाच्या मार्गावर अवजड वाहने येण्यास बंदी केली आहे त्यामुळे त्यांना इतरत्र वळविण्यात आले आहे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सीसीटीव्ही च्या माध्यमातून करडी नजर ठेवण्यात येणार आहे ठाणे महानगरपालिकेच्या वतीने देखील अग्निशमन दल रुग्णवाहिका आणि स्वयंसेवक ठेवण्यात आले आहे. ठाण्यातील रेतीबंदर रोड येथील घाट कळवा पारसिक घाट,विटावा गणेश घाट, साकेत घाट, मासुंदा कृत्रिम तलाव अशा सर्व घाटांवर पोलिस आणि महापालिकेच्यावतीने विसर्जन घाटावर जय्यत तयारी केलेले आहे. दहाव्या दिवसाच्या गणरायासाठी विसर्जयासाठी घाटावर मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात आली आहे. ठाण्यातील मुंब्रा येथील रेतीबंदर या भागात पंधरा ते वीस फूट उंचीच्या गणरायाच्या मुर्ती विसर्जनासाठी येत असतात त्यासाठी एकूण तीन विसर्जन घाट तयार करण्यात आले आहेत, भक्तांची गर्दी पाहता यंदा तिसरा विसर्जन घाट या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे, तसेच मूर्ती साठी विशेष ट्रॉल्या देखील ठेवण्यात आलेले असल्याची माहिती वाहतूक विभागाचे उपायुक्त अमित काळे यांनी दिली.
Byte अमित काळे उपायुक्त ठाणे पोलीस
Byte आयोजक अशोक जाधवConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.