ETV Bharat / state

ठाण्यात नऊ वर्षीय मुलीवर श्वानाचा हल्ला, थोडक्यात बचावली

रविवारी दुपारी मुस्कान घराजवळील परिसरात मित्रांसोबत खेळत होती. त्यावेळेस एका भटक्या कुत्र्याने तिच्यावर हल्ला केला.

मुस्कान अन्वर शेख
author img

By

Published : Mar 19, 2019, 8:49 PM IST

ठाणे - भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या ठाणेकरांसाठी आव्हान ठरले आहे. साईनाथनगर परिसरात घराच्या प्रांगणात खेळत असलेल्या नऊ वर्षीय मुलीला भटक्या श्वानाने चावा घेतल्याची घटना समोर आली आहे. श्वानाच्या हल्ल्यात मुलीच्या डोक्याला नऊ टाके पडले असून तिचा डोळा थोडक्यात बचावला आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. मुस्कान अन्वर शेख (९) असे जखमी मुलीचे नाव आहे.

संबंधित व्हिडीओ

मुस्कान वर्तकनगर येथील साईनाथनगर परिसरात आपल्या कुटूंबासह राहते. ती माजीवाडा येथील ग्रामीण शिक्षण संस्थेच्या शाळेमध्ये दुसरीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. रविवारी दुपारी ती घराजवळील परिसरात मित्रांसोबत खेळत होती. त्यावेळेस एका भटक्या कुत्र्याने तिच्यावर हल्ला केला. या हल्ल्यामुळे ती खाली पडली आणि त्यानंतर कुत्र्याने तिच्या डोक्याजवळ चावा घेतला. यावेळी तिच्या मित्रांनी पळ काढल्यामुळे ते हल्ल्यातून बचावले.

Dog bite, girl
परिसरातील भटकी कुत्रे

मुस्कानला ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते. मात्र, तिच्या डोळ्याजवळ जखम असल्यामुळे तिला मुंबईच्या जेजे रुग्णालयात उपचासाठी नेण्यात आले. डॉक्टरांच्या तपासणीत तिच्या डोळ्याला जखम झालेली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. डोळ्याजवळील जखमेमुळे तिला अजूनही डोळा उघडता आलेला नाही. तसेच तिच्या डोक्याला नऊ टाके पडले आहेत. उपचारानंतर डॉक्टरांनी तिला घरी सोडले आहे.

Intro: नऊ वर्षीय मुलीवर श्वानाचा हल्ला- डोळा वाचला
भटक्या कुत्र्यांचा प्रश्न गंभीरBody:

ठाण्यात भटक्या कुट्यांची वाढती संख्या हि आता ठाणेकरणांसाठी आव्हान ठरले असल्याने ठाण्यात पुन्हा एकदा भटक्या श्वानाचा प्रश्न आणचिमुरड्यांची प्रश्न ऐरणीवर आला आहे. असाच एक धक्कादायक प्रकार ठाण्याच्या साईनाथनगर परिसरात घडला. घराच्या आसपास प्रांगणात खेळत असलेल्या नऊ वर्षीय मुलीला भटक्या श्वानाने चावा घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. श्वानाच्या या हल्ल्यात मुलीच्या डोक्याला नऊ टाके पडले असून तिचा डोळा थोडक्यात बचावला आहे. या घटनेमुळे परिसरात भटक्या श्वानांची दहशत निर्माण झाली असून यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे.
भटक्या श्वानाच्या हल्यात मुस्कान अन्वर शेख (9) ही मुलगी गंभीर जखमी झाली आहे. ती वर्तकनगर येथील साईनाथनगर परिसरात आपल्या कुटूंबासह राहते. ती माजीवाडा येथील ग्रामीण शिक्षण संस्थेच्या शाळेमध्ये दुसरीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. रविवारी दुपारी ती घराजवळील परिसरात दोन ते तीन मित्रंसोबत खेळत होती. त्यावेळेस एका भटक्या कुत्र्याने तिच्यावर हल्ला केला. या हल्ल्यामुळे ती खाली पडली आणि त्यानंतर कुत्र्याने तिच्या डोक्याजवळ चावा घेतला. यावेळी तिच्या दोन ते तीन मित्रंनी पळ काढल्यामुळे ते हल्ल्यातून बचावले. ठाणो जिल्हा शासकीय रु ग्णालयात मुस्कानला उपचारासाठी नेण्यात आले होते. मात्र, तिच्या डोळ्याजवळ जखम असल्यामुळे तिला मुंबईच्या जेजे रु ग्णालयात उपचासाठी नेण्यात आले. डॉक्टरांच्या तपासणीत तिच्या डोळ्याला इजा झालेली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. डोळ्याजवळील जखमेमुळे तिला अजूनही डोळा उघडता आलेला नाही. तसेच तिच्या डोक्याला नऊ टाके पडले आहेत. उपचारानंतर डॉक्टरांनी तिला आता घरी सोडले आहे.
Byte संतोष निकम (सामाजिक कार्यकर्ते)Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.